Rajan Raje

नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं […]

नववर्षांचे स्वागत आणि संदेश…… Read More »

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!!

नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसूली करणा‍ऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB कंपनी ही, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हाताशी धरुन पडद्याआड ‘काळेधंदे’ करणारी ‘कॉर्पोरेट-ठग’ आहे….. हे ही महाराष्ट्रातली जनता

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!! Read More »

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव, फक्त एक सुरूवात मात्र आहे! देशी-विदेशी उद्योगपतींना आणि मिडीयाला हाताशी धरुन हे ‘नरेंद्र मोदी’ नांवाचे

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!! Read More »

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???”

सर्वप्रथम, ‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष, या नात्याने मला हे गर्जून सांगू द्या की, “सर्वश्री अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना स्विकारणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा, भारतातील सर्वात पहिला नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे !” “अर्थक्रांति-संकल्पनेचं चर्चाचर्वित याअगोदरच अनेक माध्यमांतून व विविध स्तरांवरुन फार मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यानं, त्या तपशीलात फारसं न डोकावता; फक्त, या सोन्यासारख्या संकल्पनेच्या संदर्भातील राजकीय अपरिहार्यता, चळवळीतील कार्यकर्त्यांची

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???” Read More »

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन)

निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट, असा जणू ‘जीवनमंत्र’ झालाय. रोजगार ‘भरपूर’ आहेत पण ते एकतर मोठया कारखान्यांमधून कंत्राटदारीच्या

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन) Read More »

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून… माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली… भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले… कारभारणीला घेऊन संगे, मी आता लढतो आहे… पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात देऊन, तुम्ही

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने Read More »

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू” Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »

“वाचाल, तरच वाचाल” !!!

(मित्रहो, राजन राजे यांच्या ‘तळमळी’तून साकारलेला, हा केवळ एक ‘लेख’ नसून ‘मराठी’ सद्यस्थितीचा ‘शिलालेख’ आहे…. कृपया, कुठुनही व कसाही आपला थोडासा, मूल्यवान असा वेळ काढून आपण तो वाचावाच, ही आमची आपल्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे नम्र विनंति आहे…. बहुश: मिडीया हा, प्रिंट(वृत्तपत्र) असो वा इलेक्ट्रॉनिक(दूरदर्शन वाहिन्या), तो ‘शेठजी-संस्कृती’च्या किंवा राजकारण्यांच्या मालकीचा…. मग, त्यांनीच केलेल्या ‘कोंडी’मुळे घुसमटलेला आपला

“वाचाल, तरच वाचाल” !!! Read More »