कंत्राटी कामगार

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’ […]

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)…. Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री)

सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वश्री अजितदादा पवार, “शासकिय-सेवेत एका ‘कायम’ कर्मचाऱ्याच्या जागी तीन ‘कंत्राटी-कर्मचारी’ घेता येतील”, या आपल्या ‘कामगारहितदक्ष कल्याणकारी-उच्चारणा’ला एकप्रकारचं ‘कामगारविरोधी वाक्ताडन’च समजून… आम्ही पामरांनी फार चुकीचा अर्थ लावला हो आणि आपल्यावर नाहक टीकेचा केवढा काहूर माजवला आम्ही… प्रथम, त्याबद्दल क्षमस्व! आपला मूळ उद्देश किती गहन होता, हे अंमळ उशिरानेच आमच्या ध्यानी आलं (“आपण बोलून मोकळं

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री) Read More »

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय,

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय???

केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!  ‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय??? Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »