विशेष लेख

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच…..

सिटू (CITU…सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स) या मार्क्सवादी-कम्युनिस्ट पक्षाच्या (जो तामीळनाडूत DMK आघाडीचा सहयोगी पक्ष आहे) संघटनेशी संलग्न असलेल्या ‘सॅमसंग इंडिया वर्कर्स युनियन’ने पुकारलेला संप, पोलिसी-दडपशाहीला झुगारुन सप्टेंबर ९-२०२४ पासून सुरु असून, कदाचित उद्याच्या बुधवारी (दि.१७ ऑक्टोबर-२०२४) तो संपेलही; पण, त्याचं ‘कवित्व’ दीर्घकाळ शिल्लक राहीलच! …चांगल्या दर्जाचं अन्न कॅन्टीनमधून देणे, कामगार-कर्मचारीवर्गाला येण्याजाण्यासाठी वातानुकूलित एसी-बसेस पुरविणे […]

“सॅमसंगसारख्या भारतातील सरसकट सगळ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची मस्ती एकदाची उतरवाच….. Read More »

रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करत असताना….

‘सामाजिक-योगदान’ देण्यात अपयशी ठरल्याचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर ठपका ठेवणाऱ्या…महान उद्योगपती ‘रतन टाटा’ यांना श्रद्धांजली वाहत असतानाच; त्यांच्या ‘परिनिर्वाणा’ला जोडून आलेल्या आजच्या ‘जागतिक मानसिक-आरोग्य दिनी’ (World Mental-Health Day) तरी, ‘भांडवली-व्यवस्था’ स्वतःचं ‘आत्मपरीक्षण’ (Self-Reflection) करणार आहे किंवा नाही…??? ——————————————————— कधि कुठल्या उद्योगपतीला भेटावसं चुकूनही वाटत नसताना…अनेकदा असं वाटून गेलं की, आपण ‘रतन टाटां’सारख्या, उद्यमशीलतेच्या नफ्यातोट्याच्या मर्यादित परिघापलिकडे, उत्तुंग आसमंतात

रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करत असताना…. Read More »

“बैल गेला आणि झोपा केला….”

महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीवरील ‘गुजराथी भांडवली-लाॅबी’च्या करकचून पडलेल्या विळख्याने ‘मराठी-श्वास’ गुदमरला असताना…मराठी-भाषा ‘अभिजात’ होण्याचा नेमका उपयोग काय आणि तो उपयोग कोणाला…??? मराठी-भाषा ‘अभिजात’ म्हणून जाहीर करण्यामागचा मूळ कुटील हेतू…जाणून न घेताच किंवा त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करत; ज्यापद्धतीने, स्वतःला साहित्यिक म्हणवणारे एकजात सगळेच महाभाग…गळे काढून तारस्वरात ‘डबल-इंजिन’ सरकारचं (दिल्ली आणि मुंबईस्थित) बेफाम कौतुक करताना दिसतायत…ते पहाता, थोडी

“बैल गेला आणि झोपा केला….” Read More »

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!”

एकापाठोपाठ एक परिस्थितीवशात ‘माफीचा रतीब’ घालणाऱ्यांनो, आम्ही मतदार म्हणून अनेकदा मूर्ख बनत असतो…कधि ‘सब का साथ, सब का विकासा’च्या नादानं; तर, कधि ‘बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपानं…आम्ही सहजी मूर्ख बनवले जात असतो…आणि, प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘उल्लू’ तर पिढ्यानपिढ्या बनलेलो असतोच (सध्या, आम्ही सत्ताधाऱ्यांचे अचानक ‘लाडके भाऊबहिण’ झालोत)…पण, आम्हाला एवढेही ‘बिनडोक’ समजू नका की, आमच्या ‘महाराष्ट्र-पुरुषा’चा पुतळा, तुमच्या किळसवाण्या

“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!” Read More »

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान”

पाश्चात्य देशात, जनता स्वतः वर्गणी जमा करुन आपापल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे उभारते…अगदी, अमेरिकन ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा’ (Statue Of Liberty) देखील, विविध सार्वजनिक-उपक्रम राबवून, जनतेनेच पैसा गोळा करुन उभारला होता. पण, आपल्याकडे जनतेला भांडवली-व्यवस्थेनं एवढं ‘कफल्लक’ आणि राजकारण्यांनी एवढं ‘फुकटं’ बनवून ठेवलंय की, जनता पुतळे उभारण्यासाठी सोडाच; पण, निवडणुका लढवण्यासाठी देखील कपर्दिकही (जुन्या काळचं नाणं) देत

“भ्रष्टाचाराच्या छायेत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान” Read More »

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय!

“महाराष्ट्रात महागुंतवणूक” अशा दिलखेचक शीर्षकाखाली लिथियम बॅटरी, EV, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मितीच्या वगैरे क्षेत्रातील ८१ हजार कोटींच्या राज्यातील गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांची व त्यातून, २०-२५ हजार थेट रोजगारांची; तर, ५० हजार अप्रत्यक्ष रोजगारांची राणाभीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मोठी गर्जना केलीय (उपमुख्यमंत्री अशा महत्त्वपूर्ण घोषणा करत असतात…तेव्हा, मुख्यमंत्री फक्त ‘तोंडी लावण्यापुरतेच’). या घोषणांचे पतंग हवेत

हाती गद्दारीचा ‘खंजीर’ असणाऱ्यांना, महाराष्ट्राचा ‘खंबीर’ कामगार, हेच योग्य उत्तर होय! Read More »

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा! जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. Read More »

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल (युनोचे हवामानबदल-समितीचे प्रमुख) निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपल्यासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या आसाला भिडलेला हा क्षीण स्वर, ऐकू येतोय का आपल्याला, जरा पहा…!!! जागतिक अर्थमंचाच्या (WEF) व्यासपीठावर वर्चस्व गाजवणारी G-20 राष्ट्रे (ज्याची, १८ वी परिषद गेल्यावर्षी ९-१० सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या दिमाखात भरवली गेली होती)…ही, जगातील

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल Read More »

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया…

सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर! —————— …मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय? एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया… Read More »

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया…

उत्तर-दिशादिग्दर्शन करत, रात्रीच्या अंधःकारमय विश्वात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या, आकाशातल्या अढळ ध्रुव तार्‍यासारखेच भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरलेल्यांपैकी एक ‘ध्रुव राठी’… एखाद्या ‘अग्निपथावरावरुन चालणाऱ्या अग्निवीरा’सारखा (मोदी-शाह सरकारकडून गंडवले गेलेले ‘अग्निपथावरील लष्करी अग्निवीर’ नव्हे!) या व्हिडीओतून… महाभारत युद्धसमयी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं विश्वरुप दर्शन घडवलं होतं…तसंच, मोदी-शाह सरकारच्या ‘काॅर्पोरेट-शाही’च्या काळ्याकुट्ट अंतरंगाचं रौद्रभीषण दर्शन आपल्याला घडवतोय! अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया… Read More »