राजकारण

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे!

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! महाराष्ट्राची निवडणूक आटोपताच ‘बीजेपी’चा हत्ती…आपले खरे दात दाखवायला लागलाय. भाजपा( NDA) सरकारने आता तीन काळ्या कामगार-कायद्यांनी बनलेली ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) झपाट्याने लागू करायला घेतलीय…कल्पनातीत अशा भयंकर गुलामगिरीला व कंपनी-दहशतवादाला रोजच्या रोज तोंड देत काॅर्पोरेटीय क्षेत्रात आणि इतरही छोट्यामोठ्या कंपन्या-कारखान्यांमधून सगळ्यांनाच नोकरी मुठीत धरुन जगावं […]

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! Read More »

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात….

मुसलमानांची जिरवायची म्हणून मराठे भाजपसोबत, मराठ्यांची (जरांगे-पाटलाची) जिरवायची म्हणून ओबीसी भाजपसोबत, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीला (‘अंगापेक्षा बोंगा मोठा’, असा तो ‘अतिहावरेपणा’ला का असेना) कधिच सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत; म्हणून, ‘मविआ’ची जिरवायला ‘दलित’ भाजपसोबत आणि शिवसेनेनंच ‘भाजप-संघा’ला मोठं केलं; म्हणून, शिवसेनेची जिरवायला ‘मुसलमान’ भाजपसोबत…. …ही विधानसभा-निवडणूक म्हणजे, “मत अडवा, मत जिरवा”, असा कुठला ‘जिरवाजिरवी’चा ‘एक कलमी’ किंवा

महाराष्ट्र-विधानसभा-निवडणुकीचा अन्वयार्थ, थोडक्यात…. Read More »

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”

“विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही…या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय… आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”, ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर…. “पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती…!!!” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल. …यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री” Read More »

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत….

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत…. लोकसभा-निवडणुकीनंतर जर, दुसर्‍या क्रमांकाचं महत्त्व कशाला असेल; तर ते आहे, महाराष्ट्राच्या विधानसभा-निवडणुकीला! अमेरिकेत न्यूयाॅर्कचं, जे राजधानी ‘वॉशिंग्टन’पेक्षाही मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व…तेच, मुंबई-महाराष्ट्राचं दिल्लीहूनही कितीतरी पटीने अधिक महत्त्व…म्हणूनच, ‘गुजराथ-नागपूर’ परिवारातल्या ‘वासवी’ भांडवली-‘संघ’शक्ति एकत्र येऊन (हा

कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत…. Read More »

‘बदला पुरा’, अशा देवाभाऊच्या यूपी-स्टाईल बॅनरबाजीचा ‘हिसाब पुरा’….

** ज्या सरकारने बदलापूर लैंगिक-शोषण प्रकरणातील आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करवला…त्या सरकारला, ज्या ‘काळी टोपी’धारी कट्टर संघीय राज्यपालाने सत्तेवर बसण्यासाठी आशिर्वाद दिला; त्या राज्यपालांचा तो निर्णय, सर्वोच्च न्यायालयीन निर्णयानुसार घटनाविरोधी…म्हणजेच, गेली अडीच वर्षे सत्तेवर जबरदस्तीने बसवलं गेलेलं एकनाथ-देवेंद्र (अजित पवार, हा इंजिन म्हणून जोडला गेलेला; पण, प्रत्यक्षात निव्वळ एक बघ्याची भूमिका घेणारा ‘डबा’ नंतर जोडला गेला म्हणून)

‘बदला पुरा’, अशा देवाभाऊच्या यूपी-स्टाईल बॅनरबाजीचा ‘हिसाब पुरा’…. Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा…

“फडणवीसांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ होण्याची प्रक्रिया गतिमान झालीय…फडणवीस हे महाराष्ट्राचे, कायदा धाब्यावर बसवणारे, नवे ‘योगी आदित्यनाथ’ झालेयत का?” …हे ‘एन्काऊंटर’, केवळ एका आरोपीचं नसून संपूर्ण ‘न्यायालयीन-व्यवस्थे’चं देखील आहेच, हे कसं विसरुन चालेल?? —————————————————————— सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या जाण्यातून…या देशाची न्यायव्यवस्था, भाजप-संघाची ‘बटीक’ झाल्याचा (याचा अर्थ,

देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा… Read More »

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य…

गुजराथी-भाषिक बड्या भांडवलदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची आणि ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातला ‘क’ काढण्याची हिंमत नसलेल्या…तकलादू, डरपोक मराठी-राजकारण्यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करण्याचे, धमकावण्याचे आणि ‘राडा-संस्कृती’च्या नादाने पोलिस-केसेस अंगावर घ्यायला लावून…मराठी तरुण पिढ्या न् पिढ्या बरबाद करण्याचे ‘राजकीय-धंदे’, आतातरी आवरते घ्यावेत…!!! ————————— “भितीपोटी गर्भगळीत झालेले विरोधी पक्ष नेते आणि ‘लोकशाही-देवते’चं सत्ताधाऱ्यांकडून झालेलं ‘अपहरण’ आणि ‘वस्त्रहरण’ पाहून गोंधळलेली-धास्तावलेली जनता”, हे जगाच्या

शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या, ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाप्रसंगी, काही ‘राज’कीय-समाजकंटकांनी जो काही धिंगाणा घातला, त्यावर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांचे परखड भाष्य… Read More »

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी…

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी

हे ‘मंगळसूत्र’ आणि ते ‘मंगळसूत्र’….. कुठे इंदिरेचा ऐरावत आणि कुठे नरेंद्राची तट्टाणी… Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »