भांडवली व्यवस्था

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!!

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! सर्वप्रथम, २० हजार कोटींचा ‘सेंट्रल-व्हिस्टा’ प्रकल्प (तथाकथित अमृतकाळात, सगळी ब्रिटीश व मोगल-राजवटीतली नावं बदलली जात असताना, ‘सेंट्रल-व्हिस्टा’ हे इंग्रजी नाव ठेवलं जातं किंवा गुजराथच्या ‘अहमदाबाद’चं नाव बदललं जात नाही, हे विशेषच) बांधणाऱ्या भाजपाई ‘वास्तुविशारदा’ला तुरुंगात टाका, ज्याने जेमतेम ६ […]

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! Read More »

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”! ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली! ———————————————————-

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल Read More »

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?

(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्‍या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता? Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे… अशी मांडणी करीत आलेलो आहोत! ‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे… Read More »

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय…

जवळपास ३२ जण ठार व ६० पेक्षा अधिक लोकं जखमी झालेत. या वर्षाला संपायला अजून दोन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक असताना, हे एकूण ५६५ वे सामूहिक-हत्याकांड घडलंय, याचाचअर्थ,  वर्ष-२०२१चा अशा एकूण ६८६ घटनांचा काळा-विक्रम या वर्षी मोडला जाऊ शकेल, अशी गंभीर स्थिती आहे. आजवर दरदिवशी १२० या हिशोबाने ४३,३७५ अमेरिकन माणसं, दरवर्षी बंदुकीच्या गोळीबारात मारली

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय… Read More »

ॲडाॅल्फ हिटलर का गुरु… ‘बेनेटो मुसोलिनी’ अभी जिंदा है और ‘काली टोपी’ पहना है…!!!

काल शिवतीर्थावरील शिवसेनेच्या पारंपरिक ‘दसरा-मेळाव्या’त, आपल्या आक्रमक शैलीतील भाषणात मा. उद्धवजींनी ज्या ‘काळ्या टोपी’चा उल्लेख केला (यापूर्वीही, छत्रपती संभाजीनगरमधील भाषणात, “संघाची टोपी ‘काळी’ का, ‘भगवी’ का नाही?”, असा तो प्रकर्षाने त्यांच्याकडून झाला होताच)…याचं फार मोठं औचित्य आपल्याला “4PN News Network”तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या, वरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्हिडीओतून, वाचकांच्या ध्यानात यावं! …खरंतरं, बेनेटो मुसोलिनीच्या ‘काळी

ॲडाॅल्फ हिटलर का गुरु… ‘बेनेटो मुसोलिनी’ अभी जिंदा है और ‘काली टोपी’ पहना है…!!! Read More »

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’

अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍यांच्या, मानसिकतेत आणि त्याच्या विविध प्रणाली (Systems) तसेच, त्यांच्या अत्याधुनिक संसाधनांमध्ये निर्घृण ‘हिंसाचार’ सुप्त स्वरुपात खोलवर दडलेला असतो! वरकरणी, ते बेमालूम ‘सभ्यता व माणुसकी’चं सोंगढोंग वठवत रहातात जरुर…पण, जाणकाराला त्यांच्या प्रत्येक कृतित, चालीत व हालचालीत ‘हिंसाचारा’ची विकृती, ओंगळवाण्या स्वरुपात ओघळताना दिसत रहाते. अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर झाल्यावर, तो अन्याय-अत्याचार, ते अनन्वित शोषण सातत्याने सहन करणारा पापभीरु

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’ Read More »

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »