Rajan Raje

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या […]

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

या जगाला आज, एखादा तरी ‘गांधी’, एखादा तरी ‘बुद्ध’ हवा..!!!

सूड कितीही भीषण असला तरी, तो जेव्हा गाझापट्टीतून येतो, तेव्हा तो निश्चितच ‘जंगली-न्याया’चं स्वरुप लेवूनच येतो… म्हणूनच, या जगाला आज, एखादा तरी ‘गांधी’, एखादा तरी ‘बुद्ध’ हवा..!!! आजचं आधुनिक जग, प्रचंड समृद्ध व संसाधनसंपन्न असूनही प्रचंड अस्वस्थ असणं… चंद्रसूर्य, मंगळापर्यंत मानवी-अंतराळयाने पोहोचूनदेखील माणूस माणसापर्यंत पोहोचू न शकणं… हा सगळा एकूणच, म. गांधी, आजच्या जगात नसल्याचा

या जगाला आज, एखादा तरी ‘गांधी’, एखादा तरी ‘बुद्ध’ हवा..!!! Read More »

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!!

सतत, आपला राजकीय स्वार्थ व सोयीनुसार बदलत्या राजकीय-भूमिका आणि गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून झपाट्याने ‘बेदखल’ होऊ लागलेल्या अजितदादा पवारांनी, ‘आखरी रास्ता और डुबने से पहले एक तिनके का वास्ता” म्हणून, आपल्या मंत्रिमंडळातील दोन मुस्लिम मंत्र्यांसोबत (हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार) घेतलेल्या बैठकीत “५% मुस्लिम आरक्षणा”चा एल्गार करुन सध्याच्या गद्दारीच्या, फोडाफोडीच्या महाराष्ट्रीय राजकारणात मोठा बाॅम्बस्फोटच केलाय! अजितदादा,

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!! Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री)

सन्माननीय उपमुख्यमंत्री सर्वश्री अजितदादा पवार, “शासकिय-सेवेत एका ‘कायम’ कर्मचाऱ्याच्या जागी तीन ‘कंत्राटी-कर्मचारी’ घेता येतील”, या आपल्या ‘कामगारहितदक्ष कल्याणकारी-उच्चारणा’ला एकप्रकारचं ‘कामगारविरोधी वाक्ताडन’च समजून… आम्ही पामरांनी फार चुकीचा अर्थ लावला हो आणि आपल्यावर नाहक टीकेचा केवढा काहूर माजवला आम्ही… प्रथम, त्याबद्दल क्षमस्व! आपला मूळ उद्देश किती गहन होता, हे अंमळ उशिरानेच आमच्या ध्यानी आलं (“आपण बोलून मोकळं

“एका कायम कर्मचाऱ्याच्या जागी तीन कंत्राटी-कर्मचारी”- अजित पवार (उपमुख्यमंत्री) Read More »

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय,

दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही?

देश राज्यघटनेनुसार ‘संघराज्यीय’ पद्धतीने चालतोय की, राज्यघटनेतल्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन मनमानी पद्धतीने?? (‘पेगॅसस सॉफ्टवेअर’सारखी अनेक लोकशाहीविरोधी व घटनात्मक तरतुदींना हरताळ फासणारी एकापेक्षा एक प्रकरणे उजेडात येत असतानाच… ”लोकशाहीमूल्यांना व संकेतांना” पायदळी तुडवणारा सगळा घटनाक्रम काही थांबायलाच तयार नाही…) १) भारत आज, “बुलडोझर-रिपब्लिक” , उद्या काय यादवीयुद्धग्रस्त “बनाना-रिपब्लिक”??? काॅ. वृंदा करात, ही ७५ वर्षीय लढवय्यी ‘मार्क्सवादी

देशात हुकूमशाही आहे की, लोकशाही? Read More »

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय

दंगली करण्यात, सध्या ‘मुस्लिम/ओबीसी’ अनेकठिकाणी आघाडीवर दिसतात… कारण, अनुसूचित जाती-जमातीचे (SC/ST) तरुण आता थोडेबहुत शहाणे व्हायला लागलेत म्हणून, हल्ली, स्वतःच्या घरातली व जवळची पोरंबाळं सुरक्षित घरी आहेत, हे नीट तपासून, “पेटवा रे पेटवा” असं नेतेमंडळींनी म्हटलं तरी, सहजी दंगली पेटत नाहीत आणि चुकूनमाकून पेटल्या तरी चारपाच दशकांपूर्वी वेड्यावाकड्या पेटायच्या तशा पेटत नाहीत, पेटणार नाहीत…. सत्यपरिस्थिती

महाराष्ट्रातले बहुजन तरुण: राजकारणाचा नवा अध्याय Read More »