Rajan Raje

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।।

मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! “संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि […]

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।। Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि ||

प. पू. रामदेवस्वामींच्या प्रारंभपर्वातील ‘योगशिष्य’ होण्याचं भाग्य मला लाभण्यापूर्वी एक सर्वसामान्य ‘योग साधक’ या पवित्र नात्यानं भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) प्रचलित असलेल्या अनेकानेक योगगुरूंच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेता झालो! त्याव्दारे मला व्यक्तिगत स्तरावर झालेल्या बहुआयामी सकारात्मक परिणामांचा त्यांच्या गति आणि व्याप्तिचा त्यात अंतर्भाव असलेल्या यौगिक क्रियांची क्लिष्टता व श्रम, राबवलेल्या व्यवस्थापन पध्दती याचा तौलनिक अभ्यास करत

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि || Read More »

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६०

‘नॉएडा’ चा धडा! Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने…..

तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने….. Read More »

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’!

——————————————————————————- (कृपया वेळात वेळ काढून वाचा आणि गांभिर्याने विचार करून कृतिशील व्हा!) ——————————————————————————– निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट,

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’! Read More »

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण (globalization)ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ‘आर्थिक-प्रक्रिया’ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे केवळ देशाची सीमा खुली करीत आपली अर्थव्यवस्था जगाच्या

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!! Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लढवू पणाला प्राण… किसान-मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील सारे रान… कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील अडवणूक त्या करणाऱ्यांची, उडवू दाणादाण… शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान… पडून ना राहू आता, खाऊ ना आता

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? Read More »