कंत्राटी-कामगार पद्धत

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी […]

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे… अशी मांडणी करीत आलेलो आहोत! ‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे… Read More »

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’

अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍यांच्या, मानसिकतेत आणि त्याच्या विविध प्रणाली (Systems) तसेच, त्यांच्या अत्याधुनिक संसाधनांमध्ये निर्घृण ‘हिंसाचार’ सुप्त स्वरुपात खोलवर दडलेला असतो! वरकरणी, ते बेमालूम ‘सभ्यता व माणुसकी’चं सोंगढोंग वठवत रहातात जरुर…पण, जाणकाराला त्यांच्या प्रत्येक कृतित, चालीत व हालचालीत ‘हिंसाचारा’ची विकृती, ओंगळवाण्या स्वरुपात ओघळताना दिसत रहाते. अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर झाल्यावर, तो अन्याय-अत्याचार, ते अनन्वित शोषण सातत्याने सहन करणारा पापभीरु

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’ Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

एसटी संपाचं कवित्व….

(उषःकाल होता होता काळरात झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!) महाराष्ट्रभरात विखुरलेला ८५ हजारांच्या वर कामगार-कर्मचारीवर्ग, एवढ्या पाच-साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपात स्वतःला झोकून देतो…. त्याचा अर्थ एकच, त्यांच्या पायाखाली दीर्घकाळ बरंच काही जळत होतं, पोटात आणि मस्तकात दीर्घकाळ एक आगीचा लोळ उठत होता. ग्रामीण मराठी जनतेनंही कमालीचा त्रास व अडचण सोसून, या आपल्या लढवय्या ‘मराठी

एसटी संपाचं कवित्व…. Read More »

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया

(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया Read More »

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय???

केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!  ‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय??? Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »