मराठी

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा ‘गांधी महात्मा’ आणि ‘गुरुजी साने’! मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे […]

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता Read More »

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’

मित्रहो, खालील सगळ्याचा अर्थ फार फार गंभीर आणि जनसामान्यांचं जीवन उध्वस्त करुन त्यांना अखंड गुलामगिरीत ढकलण्याचा फक्त, आहे… गेल्या दोनतीन दशकांपूर्वीपासूनच आम्ही “कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती”ची अवदसा आली, …आता ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ येणार, हे गंभीर इशारे सातत्याने देत होतो; पण, ऐकतो कोण??? “शहर-उपनगरातले नोकरदार आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसह अलुतेदार-बलुतेदार, बाजारपेठेतील आपली सगळी ‘आर्थिकपत’ या ‘कंत्राटीकरणा’च्या फेऱ्यात गमावून बसले

कृषी विधेयके म्हणजे ‘कंत्राटी-शेतीपद्धती’ Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. “नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. Read More »

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…???

‘करोना महारोग’ बराचसा अनावश्यक हवाईप्रवास करणाऱ्या श्रीमंतांनी विमानातून पसरवला आणि त्याचे खाली जमिनीवर भयंकर ‘भोग’ कोण भोगतोय…. तर, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर” तसं, डोक्यावर गाडगीमडगी घेऊन रस्तोरस्ती मैलोगणिक ऊन्हातान्हात फिरणारा तो गोरगरीब भोगतोय….. या ‘मरणयातनां’पेक्षा प्रत्यक्ष ‘मरण’ बरं… अशी, आजची सामान्य लोकांची मनस्थिती आहे! केवढं हे, कमालीचं क्रौर्य? क्रौर्याने तर या ‘लाॅकडाऊन’मध्ये जणू, कळसच गाठलाय… नोटबंदीतही

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…??? Read More »

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती! ….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५%

पुढच्या निवडणुकीत “नाॅकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लाॅकडाऊन”….. Read More »

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी…

शिवछत्रपती, म्हणजे केवळ ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणांची बाजी’ होय… शिवछत्रपतींचा भर ‘तलवारी’पेक्षा ‘नांगरा’वर आणि ‘नागरी-संस्कृती’वर होता! …”सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः” म्हणून, शिवछत्रपतींचा राज्यकारभार, राजनीति आजही कालसुसंगत ठरावी…. शिवछत्रपतींनी भूदासांवरील असलेली वतनदार-सरंजामदारांची अमर्याद पिळवणूक करणारी हुकमत व सत्ता संपुष्टात आणली… सरंजामदार-जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन काढून घेऊन त्याचं भूहिनांना वाटप केलं. सर्वात महत्त्वाचं

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी… Read More »

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ…..

Terrorist>>>Traitor>>> Disruptor>>> indisputable Leader…. thy name is Arvind Kejriwal !!! सौ. सुनिताबाई, आपल्या पतीच्या दिल्ली दिग्विजयापश्चात काय प्रतिक्रिया देतायत, जरा डोकावून पाहूया तर…….. सखोल विश्लेषणाअंति, दिल्ली विधानसभा-२०२० निवडणुकीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील ‘आप’च्या दैदिप्यमान विजयाचे विविधप्रकारे अन्वयार्थ देशभरातील राजकीय विश्लेषक सुयोग्यरित्या लावत असले; तरीही, त्या विश्लेषणांच्या पलिकडे जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या सुविद्य पत्नीने दिलेली प्रतिक्रिया,

सरकारी ‘शिवजयंति’च्या पूर्वसंध्येला अरविंद केजरीवालांच्या भीमपराक्रमाचा आगळावेगळा; पण, मराठी माणसांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण अन्वयार्थ….. Read More »

‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणाऱ्या व हिटलरी-गोबेल्स प्रचारतंत्रात पारंगत, भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’!

‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल’’ (CAB) किंवा आताचं त्याचं, ‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट’’ किंवा ‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’’त झालेलं रुपांतरण; हे, भाजपा राजवटीत अनेक समस्यांनी याअगोदरच कमालीच्या त्रस्त असलेल्या भारतात, अत्यंत खतरनाक अशा धर्माधारित ‘ध्रुवीकरणा’ला भयंकर चालना देणारी देशविघातक ‘बाब’ आहे…. हे गल्लीतला शाळकरी असलेला अथवा नाके तापवणारा एखाद्या ‘बाब्या’ही सांगेल! पण, सध्या अति चर्चाचर्वित होऊन (जे ‘भाजप’च्या पथ्यावरच

‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणाऱ्या व हिटलरी-गोबेल्स प्रचारतंत्रात पारंगत, भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’! Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »