महाराष्ट्र

“मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच???”

“दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”, अशी वैश्विक प्रार्थना करीत, अवघ्या प्राणीमात्रांसाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान‘ मागितलं…. तेवढ्यावर न थांबता, “अमृतातेहि पैजासी जिंके…. माझा मराठीची बोलू कौतुके”, असा गर्वोन्नत छातीनं आपल्या मराठी भाषेचा उल्लेख केला…. त्या, आमच्या ‘मायमराठी‘ची, तिच्याच महाराष्ट्रात शब्दशः ससेहोलपट सुरु असताना, “गुजराथमध्ये काय घडतयं, ते जरा नीट डोळे उघडून पहा”! अवघ्या भारतातल्या […]

“मी मराठी… असं फुटकळ अभिमानाने मिरवणारे आम्ही, अजून झोपलेलेच???” Read More »

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

“नूतन वर्षाभिनंदन….!!!”

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!! ‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण

“नूतन वर्षाभिनंदन….!!!” Read More »

“आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस”

मोहम्मद दिलावर या भारतीय पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने स्थापन केलेल्या, “नेचर फाॅर एव्हर सोसायटी ऑफ इंडिया” या सामाजिक संस्थेनं, फ्रान्स वगैरे देशांमधल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्ष-२०१० मध्ये, प्रथमच २० मार्च रोजी “आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस” (world sparrow day) साजरा केला…. ही तमाम भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे! २० मार्च रोजी प्रत्येक वर्षी हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश…. “चिमणीसारखे

“आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस” Read More »

इतिहास हा, कोळशासारखा असतो…..

“तप्त-गरम असताना तो हात भाजून काढतोच; पण, थंड असताना हातात धरला, तरी हात काळा केल्याखेरीज रहात नाही!” त्यामुळेच, तो “जो थांबला, तो संपला”…. या न्यायाने, “जो इतिहासात बुडाला, त्याचं भविष्य बुडालं!” इतिहास, हे केवळ डोळ्यात घातलं जावं असं ‘अंजन’ मात्र आहे…. त्यातून बोध जरुर घ्यायचा. पण, दिवसाचे चोवीस तास त्याचा ‘पाताळशोध’ नाही घ्यायचा की, त्याला

इतिहास हा, कोळशासारखा असतो….. Read More »

आता, सगळं शांत शांत झाल्यावर…

“आता, सगळं शांत शांत झाल्यावर… कोणाला इस्पितळात रक्ताची गरज लागल्यास, आपापल्या जातीचे लेबल असलेल्या रक्ताच्या बाटल्या घ्या… पोलीस स्टेशन आणि कोर्टात आपापल्या जातीचे वकील न्या… म्हणजे, जिंकलात जातभाईंनो” !!! जळलेल्या मोटरसायकली, बहुशः कंत्राटी-कामगार असलेल्या मराठी पोरांनी हौशीनं बँकेचं कर्ज काढून घेतलेल्या असणार (अर्थात, औकात नसताना पोरींवर इंप्रेशन पाडायला!) ….तोडफोड झालेल्या बसेस तर, आमच्याच मायमराठी जनतेच्या

आता, सगळं शांत शांत झाल्यावर… Read More »

आमचा सुरेश अखेर गेलाच

आजच्या काळात ‘कार्यकर्ता’ शब्द उच्चारताच, जी आपल्या डोळ्यापुढे एक कलंकित ‘प्रतिमा’ उभी राहते, त्या प्रतिमेला पूर्णतः छेद देणारे जाज्वल्य कार्यकर्ते मला माझ्या तीन तपांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत लाभले, हे माझं फार मोठं भाग्य होय! नाही म्हणायला, आपले स्वार्थी व बदमाषीचे ‘अॅजेंडे’ घेऊन फिरणारे अत्यंत हिणकस कार्यकर्तेही याच कालखंडात दुर्दैवाने नशिबी आलेच…. त्यातले तर काही, चोवीस तास

आमचा सुरेश अखेर गेलाच Read More »

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!”

….. ‘आजच्या (दि. २९ नोव्हेंबर-२०१७, बुधवार) दैनिक ‘पुण्यनगरी’च्या ‘वेध’ सदरात माननीय संपादक सोपान बोंगाणे यांनी, आपल्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! याच संदर्भात, सध्या “भारतीय नद्यांचं पुनरुज्जीवन”, हा विषय घेऊन सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांच्या व जनतेच्या सहकार्यातून भारतभर एक फार मोठी मोहीम हाती

“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!” Read More »

सदोष मनुष्यवध!

२६ मे २०१६ रोजी डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोबेस कंपनीतील केमिकल रिअॅक्टरचा स्फोट होऊन १३ कामगारांचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील अॅल्युफिन या कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आणि त्यात राजेंद्र जावळे या कामगाराचा मृत्यू झाला. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज-२ मधल्याच ‘इंडो अमाइन’ या कंपनीत स्फोट झाला होता. डोंबिवली

सदोष मनुष्यवध! Read More »

‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय???

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर-२०१६ रोजी नरेंद्र मोदी सरकारकडून धक्कादायकरित्या करण्यात आलेल्या, ‘नोटाबंदी’चं समर्थन करुन ‘घोडचूक’ करणाऱ्या, प्रख्यात बाॅलिवूड अभिनेता कमल हसनने ‘जाहीर माफी’ मागून मनाचा मोठेपणा दाखवला….. आता, अशी जाहीर माफी किंवा किमानपक्षी, जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी, ‘अर्थक्रांती विधेयक व संकल्पने’चे प्रणेते श्री. अनिल बोकिल यांची आहे! ….पण, तेवढा मनाचा मोठेपणा स्वतः अनिल बोकिल

‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय??? Read More »