कंत्राटी-कामगार पद्धत

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल ‘सहावा‘ बळी गेला, ‘राक्षसी‘ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं….. भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी […]

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!!

गेल्या 24 तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक(उथळ व उधळय़ा विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी… हे ‘हवेत उडणाऱयां’ची काळजी घेणारे सरकार आहे की, जमिनीला धरून जगणाऱया ‘भूमीपूत्रां’ची काळजी घेणारे?) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!! Read More »

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं….

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. आता त्या चळवळीचं धुळीत पडलेलं ‘मस्तक’, उरल्यासुरल्या ‘धडा’पासून छाटून टाकण्याचे उद्योगसुध्दा, षंढासारखे नुसते उघडया–थिजलेल्या डोळयांनी पहात बसणार आहात? अजुन किती काळ हा तमाशा चालणार आहे….चालायचा आहे, तुमच्या नामर्दानगीचा !!!  “९९%च्या मतदानातून आलेली, पण १%साठी राबविली जाणारी ही तथाकथित ‘लोकशाही’, नव्हे ‘नव–सरंजामशाही’ आपण कुठवर सहन करणार आहात, मित्रांनो ???”  तेव्हा, समस्त

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. Read More »

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’

‘इंडिया रायझिंग’ किंवा ‘इंडिया शायनिंग’… म्हणतं जे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण (खाउजा धोरण) बेगुमान पध्दतीने आपल्या देशात राबवले गेले, त्यामुळे आपल्या देशात गेल्या १५-२० वर्षांमध्ये निर्माण झालेली संपत्तीची अफाट मोठी ‘गंगा’ (जेवढी संपत्ती या अगोदरच्या १५० ते २०० वर्षांत कधी निर्माण झालेली नव्हती!) समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांपर्यंत, ‘झिरप-सिध्दांता’नुसार (Percolation or Trickled Down) पोहचू ‘न’

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ Read More »

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

टिव्ही वरील ‘बिग् बॉस’ कार्यक्रमाबाबत आमची दलित नेतेमंडळी भलतीच संवेदनशील झाल्याचं आपण पाहतो, पण कंपन्यांमध्ये, औद्योगिक आस्थापनांमध्ये तेथील ‘बिग् बॉस्’ ने मजूर-कंत्राटदारीचा हूकमी एक्का हातात आल्यापासून जो अमानुष धुमाकुळ घातलाय आणि त्यातून जो त्यांनी माणूसकीला गिळणारा ‘औद्योगिक-अस्पृश्यतेचा’ ब्रम्हराक्षस निर्माण केलेला आहे, त्याप्रती मात्र ही बहुजन नेतेमंडळी संवेदनाशून्य झाल्याचं भेसूर चित्र सर्वत्र दिसतंयं! अखेरीस ‘अस्पृश्यता’ म्हणजे

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता” Read More »

कामगारांचं बजेट!!!…

आपल्या मराठीत एक म्हणं आहे, ‘आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार?…’ १९९१-९२ नंतरच्या ‘खाउजा’(खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चात गेल्या सुमारे १५-२० वर्षात देशात एवढया संपत्तीची निर्मिती झाली की, जी १५०-२०० वर्षे झाली नव्हती. एखादा ‘आड’… एखादी ‘विहीर’ पाण्यानं जर पुरेशी भरायची असेल आणि त्या पाण्याचा तृषार्तांना लाभ व्हायचा असेल, तर भूगर्भातील पाण्याचे जिवंत झरे त्या

कामगारांचं बजेट!!!… Read More »

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६०

‘नॉएडा’ चा धडा! Read More »