पर्यावरण

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा […]

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!!

नुकताच (४ मार्च-२०१९) प्रकाशित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूनो) सहावा ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) हा, संपूर्ण जगताला अत्यंत गंभीर इशारा देऊ पहातोय! ‘‘शाश्वत स्वरुपाच्या विकासा’’चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्याद्वारे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पॅरिस करारात नमूद केलेल्या सर्व उपाययोजना कुठलीही हयगय न करता, युध्दपातळीवरुन अंमलात आणाव्या लागतील, असा हा अहवाल म्हणतोय.

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!! Read More »

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! एखाद्या वर्षाच्या ज्यादिवशी, निसर्गाच्या वार्षिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात, मानवजात नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, लाकूड, अन्न, कार्बन इ.) अधिकचा वापर करु लागते…. तो दिवस, “पृथ्वी सीमोल्लंघन वा मर्यादोल्लंघन दिन” म्हणून ओळखला

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! Read More »

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

इतिहास हा, कोळशासारखा असतो…..

“तप्त-गरम असताना तो हात भाजून काढतोच; पण, थंड असताना हातात धरला, तरी हात काळा केल्याखेरीज रहात नाही!” त्यामुळेच, तो “जो थांबला, तो संपला”…. या न्यायाने, “जो इतिहासात बुडाला, त्याचं भविष्य बुडालं!” इतिहास, हे केवळ डोळ्यात घातलं जावं असं ‘अंजन’ मात्र आहे…. त्यातून बोध जरुर घ्यायचा. पण, दिवसाचे चोवीस तास त्याचा ‘पाताळशोध’ नाही घ्यायचा की, त्याला

इतिहास हा, कोळशासारखा असतो….. Read More »

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे….

टोकाची आर्थिक-विषमता, हे भारतीय-समाजातील एक अत्यंत खळबळजनक, धोकादायक आणि प्रस्थापित ‘रक्तपिपासू-शोषक’ राजकीय-व्यवस्थेला अतिशय अडचणीचं ठरणारं उघडंनागडं ‘सत्य’ आहे! त्यामुळेच, ‘गरिबी-हटाव’चा ‘नारा’ सद्यस्थितीत महत्त्वाचा नसून ‘आर्थिक-विषमते’वर युद्धपातळीवरुन हल्लाबोल करणं, ही काळाची गरज आहे… तरीही, तारस्वरात ‘गरिबी-हटाव’चेच नारे देशात दिले जातायतं….. ‘धर्मराज्य पक्ष’ वगळता एकही राजकीय पक्ष, या मुद्द्यावर ना गांभीर्याने विचार करताना…. ना कुठली कृति करताना,

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे…. Read More »