कामगार व उद्योग (Labour & Industry)

सदोष मनुष्यवध!

२६ मे २०१६ रोजी डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोबेस कंपनीतील केमिकल रिअॅक्टरचा स्फोट होऊन १३ कामगारांचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील अॅल्युफिन या कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आणि त्यात राजेंद्र जावळे या कामगाराचा मृत्यू झाला. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज-२ मधल्याच ‘इंडो अमाइन’ या कंपनीत स्फोट झाला होता. डोंबिवली […]

सदोष मनुष्यवध! Read More »

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” ……

“डोंबिवलीतील कालपरवाच झालेला ‘प्रोबस’ या रसायन-औषधनिर्माण कंपनीतील भीषण स्फोट, हा केवळ एक ‘अपघात’ होता का ? २६ मे-२०१६ ला दुपारी अकराच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत जे घडलं तो ‘अपघात’ नव्हता; तर, या ‘शोषक-रक्तपिपासू व्यवस्थे’ने (Vampire-State) पैशाच्या हव्यासापोटी केलेल्या गैरव्यवहारांच्या मालिकेतून अटळपणे घडणारा एक ‘घातपात’ होता ! ‘अपघात’ असे घडत नसतात… अपघातांच्या मागे कधि फारसा कार्यकारणभाव नसतो….

रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेचा “डोंबिवली-रक्तसंबंध” …… Read More »

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!”

‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे ! जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!” Read More »

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन)

निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट, असा जणू ‘जीवनमंत्र’ झालाय. रोजगार ‘भरपूर’ आहेत पण ते एकतर मोठया कारखान्यांमधून कंत्राटदारीच्या

१ मे (महाराष्ट्र व कामगार दिन) Read More »

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल ‘सहावा‘ बळी गेला, ‘राक्षसी‘ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं….. भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं….

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. आता त्या चळवळीचं धुळीत पडलेलं ‘मस्तक’, उरल्यासुरल्या ‘धडा’पासून छाटून टाकण्याचे उद्योगसुध्दा, षंढासारखे नुसते उघडया–थिजलेल्या डोळयांनी पहात बसणार आहात? अजुन किती काळ हा तमाशा चालणार आहे….चालायचा आहे, तुमच्या नामर्दानगीचा !!!  “९९%च्या मतदानातून आलेली, पण १%साठी राबविली जाणारी ही तथाकथित ‘लोकशाही’, नव्हे ‘नव–सरंजामशाही’ आपण कुठवर सहन करणार आहात, मित्रांनो ???”  तेव्हा, समस्त

कामगार चळवळीचं कंबरडं मोडून झालं…. Read More »

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’

‘इंडिया रायझिंग’ किंवा ‘इंडिया शायनिंग’… म्हणतं जे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण (खाउजा धोरण) बेगुमान पध्दतीने आपल्या देशात राबवले गेले, त्यामुळे आपल्या देशात गेल्या १५-२० वर्षांमध्ये निर्माण झालेली संपत्तीची अफाट मोठी ‘गंगा’ (जेवढी संपत्ती या अगोदरच्या १५० ते २०० वर्षांत कधी निर्माण झालेली नव्हती!) समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांपर्यंत, ‘झिरप-सिध्दांता’नुसार (Percolation or Trickled Down) पोहचू ‘न’

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ Read More »

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

टिव्ही वरील ‘बिग् बॉस’ कार्यक्रमाबाबत आमची दलित नेतेमंडळी भलतीच संवेदनशील झाल्याचं आपण पाहतो, पण कंपन्यांमध्ये, औद्योगिक आस्थापनांमध्ये तेथील ‘बिग् बॉस्’ ने मजूर-कंत्राटदारीचा हूकमी एक्का हातात आल्यापासून जो अमानुष धुमाकुळ घातलाय आणि त्यातून जो त्यांनी माणूसकीला गिळणारा ‘औद्योगिक-अस्पृश्यतेचा’ ब्रम्हराक्षस निर्माण केलेला आहे, त्याप्रती मात्र ही बहुजन नेतेमंडळी संवेदनाशून्य झाल्याचं भेसूर चित्र सर्वत्र दिसतंयं! अखेरीस ‘अस्पृश्यता’ म्हणजे

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता” Read More »

कामगारांचं बजेट!!!…

आपल्या मराठीत एक म्हणं आहे, ‘आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार?…’ १९९१-९२ नंतरच्या ‘खाउजा’(खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चात गेल्या सुमारे १५-२० वर्षात देशात एवढया संपत्तीची निर्मिती झाली की, जी १५०-२०० वर्षे झाली नव्हती. एखादा ‘आड’… एखादी ‘विहीर’ पाण्यानं जर पुरेशी भरायची असेल आणि त्या पाण्याचा तृषार्तांना लाभ व्हायचा असेल, तर भूगर्भातील पाण्याचे जिवंत झरे त्या

कामगारांचं बजेट!!!… Read More »