“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे […]

“शानू!” Read More »