Rajan Raje

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या […]

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »

“औद्योगिक-शांतता की, स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की, औद्योगिक-अस्पृश्यता?”

“Poverty anywhere, is a threat to prosperity everywhere!”… ही ‘इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या’ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ‘कॅनव्हास’वर तर मराठी कामगार-कर्मचाऱर्यांची थडगी बांधण्याची ‘कंत्राटी’ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं. एका बाजुला जगातल्या पहिल्या

“औद्योगिक-शांतता की, स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की, औद्योगिक-अस्पृश्यता?” Read More »

प्राणायाम

प्राणायामाच्या दिवसभरातील सर्वोत्तम वेळा (सूर्योदयापूर्वी माध्यान्ही स. १० ते दु. १२, वा. पर्यंत सूर्यास्तापूर्वी व मध्यरात्रीचा समय, अशा एकूण ४ वेळा) व संपूर्ण वर्षभरातील सर्वोत्तम कालावधि (वसंत ऋतु व शरद ऋतु हे दोनच) प. पू. पतंजली ऋषिंनी ‘योगदर्शनात’ वर्णिलेला असला, तरीही प. पू. रामदेवस्वामींनी ‘सप्त-प्राणायाम प्रणालीचे’ आमजनतेसाठी खुलं प्रसारण करताना, गुरूपदेश (प. पू. शंकरजी महाराज)

प्राणायाम Read More »

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।।

मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! “संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।। Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि ||

प. पू. रामदेवस्वामींच्या प्रारंभपर्वातील ‘योगशिष्य’ होण्याचं भाग्य मला लाभण्यापूर्वी एक सर्वसामान्य ‘योग साधक’ या पवित्र नात्यानं भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) प्रचलित असलेल्या अनेकानेक योगगुरूंच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेता झालो! त्याव्दारे मला व्यक्तिगत स्तरावर झालेल्या बहुआयामी सकारात्मक परिणामांचा त्यांच्या गति आणि व्याप्तिचा त्यात अंतर्भाव असलेल्या यौगिक क्रियांची क्लिष्टता व श्रम, राबवलेल्या व्यवस्थापन पध्दती याचा तौलनिक अभ्यास करत

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन । योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पतञ्जलीं प्राञ्ज लिरान तोऽस्मि || Read More »

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६०

‘नॉएडा’ चा धडा! Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने…..

तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने….. Read More »