विशेष लेख

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल (युनोचे हवामानबदल-समितीचे प्रमुख) निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपल्यासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या आसाला भिडलेला हा क्षीण स्वर, ऐकू येतोय का आपल्याला, जरा पहा…!!! जागतिक अर्थमंचाच्या (WEF) व्यासपीठावर वर्चस्व गाजवणारी G-20 राष्ट्रे (ज्याची, १८ वी परिषद गेल्यावर्षी ९-१० सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या दिमाखात भरवली गेली होती)…ही, जगातील …

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल Read More »

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया…

सर्वत्र व्हायरल झालेल्या वरील संदेशावर, ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे…आपल्या चरणी सादर! —————— …मुळातूनच ‘भांडवली-व्यवस्था’, हे मनुष्यजातीला जडलेलं, स्वतःच एक भयंकर ‘व्यसन’ असल्याने…तदनुसारच, आजची ‘कौटुंबिक-व्यवस्था’ देखील आत्मकेंद्रित व चंगळवादी बनत चाललीय, यात नवल ते काय? एकूणच भांडवली-व्यवस्थेतील अमानुष स्पर्धेला आपल्या अंगी भिनवूनच, त्याला समांतर अशी आपली आजची कौटुंबिक-व्यवस्था पुढे धावू पहाते. शिक्षण घेत असतानाचे भयानक ताणतणाव …

पुण्यातील ड्रग्सच्या नशेतील तरुणींच्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओवरील ‘धर्मराज्य पक्षा’ची प्रतिक्रिया… Read More »

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया…

उत्तर-दिशादिग्दर्शन करत, रात्रीच्या अंधःकारमय विश्वात अचूक मार्गदर्शन करणाऱ्या, आकाशातल्या अढळ ध्रुव तार्‍यासारखेच भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरलेल्यांपैकी एक ‘ध्रुव राठी’… एखाद्या ‘अग्निपथावरावरुन चालणाऱ्या अग्निवीरा’सारखा (मोदी-शाह सरकारकडून गंडवले गेलेले ‘अग्निपथावरील लष्करी अग्निवीर’ नव्हे!) या व्हिडीओतून… महाभारत युद्धसमयी श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं विश्वरुप दर्शन घडवलं होतं…तसंच, मोदी-शाह सरकारच्या ‘काॅर्पोरेट-शाही’च्या काळ्याकुट्ट अंतरंगाचं रौद्रभीषण दर्शन आपल्याला घडवतोय! अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला …

ध्रुव राठीच्या अभ्यासपूर्ण व्हिडीओवरील प्रतिक्रिया… Read More »

“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!”

शिवछत्रपतींनी शेतीला सर्वंकष उत्तेजन दिलं… शेतीला उत्तेजन देतानाच, भूमिहीन भूदासांना (Serfs) कसायला जमिनीचे पट्टे नावावर करुन दिले. नैसर्गिक-आपत्तीत बी-बियाणे, शेतीची अवजारे पुरवून प्रसंगी शेतसारा देखील माफ केला…भूमिहीन कुळांच्या आयुष्याला ‘स्थिरता’ दिली. म्हणजेच, आजच्या परिभाषेत सांगायचं; तर, ‘कंत्राटी-कामगार’, नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ना (ज्यांच्या जगण्यातली ‘सुरक्षितता, स्थिरता व सन्मान’ हिरावून घेतला गेलाय) नोकरीत ‘कायम’ केले! आपले राजकीय अंतःस्थ …

“शिवछत्रपती, म्हणजे ‘तलवारबाजी’ नव्हे, तर महान जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’!” Read More »

‘शिवजयंति’च्या निमित्ताने….

(आजच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार असलेल्या ‘शिवजयंति’च्या निमित्ताने….) शिवछत्रपतींनी एकूणच सर्वधर्मसमभावाचा, न्यायनीतिपूर्ण व्यवहाराचा (“जो चुकला, त्याला ठोकला”, या ‘व्यक्ति व जातधर्मपंथ’ निरपेक्ष रोकड्या-कणखर नीतिद्वारे)…जो केवळ, महाराष्ट्रापुरताच नव्हे; तर, संपूर्ण विश्वासाठी, मूर्तिमंत आदर्श घालून दिलाय; त्याला, कुठे तोड नाही! म्हणूनच, “शिवछत्रपती, म्हणजे केवळ, ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’ होती”! आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात, ‘आखरी …

‘शिवजयंति’च्या निमित्ताने…. Read More »

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत…..

एका बाजुला ‘भारतरत्न’ पुरस्काराची ‘खिरापत’ वाटणार्‍या…आणि, दुसर्‍या बाजुला शेतकरी-शेतमजूर, कामगार, उच्चपदस्थ अधिकारीवर्गाकडून ‘खच्चीकरण’ करण्यात आलेला पोलीसदलातील हवालदार-शिपाईवर्ग, लष्करात भरती होऊ पहाणारी नवतरुणाई (तथाकथित, अग्निपथावरील अग्निवीर), ट्रकचालक-रिक्षावाले, सेवेतून निवृत्त झालेला समस्त कामगार-कर्मचारीवर्ग….अशा, देशातल्या तळागाळातील सर्वच समाज-घटकांवर ‘आफत’ आणणाऱ्या; मोदी-सरकारचं ‘मधुरा स्वामिनाथन’कृत ‘वस्त्रहरण’…. ———————————————– ज्यांनी, १९६०च्या दशकात भारतात ‘हरितक्रांती’ आणली, त्या एम. एस. स्वामिनाथनांची मुलगी मधुरा स्वामिनाथन …

मधुरा स्वामिनाथन आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराची भाजपाई खिरापत….. Read More »

International Court of Justice (ICJ) orders Israel to prevent acts of genocide “with immediate effect”! …THE HINDU

ज्या इस्त्रायली ज्यूंनी ॲडाॅल्फ हिटलरच्या ‘वांशिक-नरसंहारा’चा सामना केला होता…त्या ज्यूंचं इस्त्रायल, हे राष्ट्रच, आज पॅलेस्टाईनींचा वंशविच्छेद करु पहातंय, यात आतातरी कुणाला कुठलीही शंका उरली नसावी! मणिपुरमधल्या दीर्घकालीन देशांतर्गत हिंसाचार-जाळपोळीकडे हेतूतः दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा करणारे आणि इस्रायलला अगदी तत्पर व उत्साहाने पाठींबा देणारे; भाजपाई-संघीय लोक, तोंडावर आपटलेत…तभी तो, ‘गोदी-मिडीया’ में इतना भारी सन्नाटा है! …राजन …

International Court of Justice (ICJ) orders Israel to prevent acts of genocide “with immediate effect”! …THE HINDU Read More »

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग…

प्रत्येक भारतीय तरुणाने (विशेषतः, मराठी-तरुणाईने), हे ध्यानात घ्यावं की, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), हेच खरंखुरं अंतरंग आहे…!!! (‘THE HINDU’च्या सौजन्याने…) ‘डेमोग्राफिक-डिव्हिडंड’ वगैरे मोठे मोठे शब्द… ‘मन की बात’पासून निवडणुकीच्या भाषणातील ‘जन से बात’पर्यंत व्यक्त होणारी भारतीय ‘तरुणाईची कवतिके’ (कौतुकं), ही भांडवली-व्यवस्थेची सगळी निर्लज्ज-निरर्गल सोंगंढोंगं असतात! …जोपर्यंत, “भांडवली-दहशतीला सपशेल शरण जाऊन, कंपन्या-कारखान्यांमधून कंत्राटी-कामगार किंवा वेठबिगार …

रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचं (Vampire-State System), खरंखुरं अंतरंग… Read More »

“लालकृष्ण अडवाणींना ‘गहना कर्मणो गतिः’, या श्रीकृष्णाच्या गीतेतल्या कर्मसिद्धांताचा जळजळीत प्रत्यय, अयोध्येतल्या राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त चांगलाच आला असेल…!!!”

अडवाणी, विनय कटियार, उमा भारती…ज्यांनी ज्यांनी म्हणून, ‘मंदिर वहीं बनायेंगे’ म्हणत दीर्घकालीन आंदोलन केलं, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगले…त्यापैकी बहुतेक कुणालाही निमंत्रण नसावं? अडवाणींना तर, अगोदर निमंत्रण देत, नंतर प्रकृति-अस्वास्थ्याचं कारण जबरदस्तीने द्यायला लावून निमंत्रण अचानक रद्द करण्यात आलं. नितीन गडकरी, राजनाथसिंह यांची अवस्था तर उद्घाटन-समारंभात, “हरवले आहेत, कुणाला सापडले तर कळवा”, अशी केविलवाणी झालेली! …

“लालकृष्ण अडवाणींना ‘गहना कर्मणो गतिः’, या श्रीकृष्णाच्या गीतेतल्या कर्मसिद्धांताचा जळजळीत प्रत्यय, अयोध्येतल्या राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त चांगलाच आला असेल…!!!” Read More »

रावणराज्यात राममंदिर…..कलियुगाचा अगाध महिमा…!!!

इटलीचा क्रूरकर्मा मुसोलिनीची ‘काळी टोपी’ घालणाऱ्या आणि लाखो-करोडोंना यमसदनी पाठवणाऱ्या जर्मनीच्या नृशंस-नराधम हिटलरला आदर्श मानणाऱ्यांच्या नादाने… भारतातली तथाकथित हिंदुत्ववादी तरुणाई, हातात भगवे झेंडे नाचवत-थिरकत ‘जय श्रीराम’ अशा, इतरेधर्मीयांना धमकावणीच्या सुरातल्या आरोळ्या देताना दिसतेय…तेव्हा, एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे, “डेमाॅक्रॅटिक (लोकशाहीप्रधान) भारताची, थिऑक्रॅटिक (धर्मप्रधान) पाकिस्तानच्या दिशेने अधोगती सुरु झालीय”…म्हणजे, पाकिस्तानचा द्वेष करता करता, आपण त्या …

रावणराज्यात राममंदिर…..कलियुगाचा अगाध महिमा…!!! Read More »