Blog

Your blog category

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।।

मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! “संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि […]

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लढवू पणाला प्राण… किसान-मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील सारे रान… कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील अडवणूक त्या करणाऱ्यांची, उडवू दाणादाण… शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान… पडून ना राहू आता, खाऊ ना आता

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? Read More »