राजन राजे

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’

अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍यांच्या, मानसिकतेत आणि त्याच्या विविध प्रणाली (Systems) तसेच, त्यांच्या अत्याधुनिक संसाधनांमध्ये निर्घृण ‘हिंसाचार’ सुप्त स्वरुपात खोलवर दडलेला असतो! वरकरणी, ते बेमालूम ‘सभ्यता व माणुसकी’चं सोंगढोंग वठवत रहातात जरुर…पण, जाणकाराला त्यांच्या प्रत्येक कृतित, चालीत व हालचालीत ‘हिंसाचारा’ची विकृती, ओंगळवाण्या स्वरुपात ओघळताना दिसत रहाते. अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर झाल्यावर, तो अन्याय-अत्याचार, ते अनन्वित शोषण सातत्याने सहन करणारा पापभीरु […]

अहंकारग्रस्त राजकीय ‘रावण-वृत्तीं’चं ‘लंकादहन’ Read More »

गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला

मरणारे ऋग्ण मेले, कोवळे जीव मारले गेले (आपण फक्त, हतबलपणे संख्या मोजत रहायची)…बाॅम्बफेक अथवा मिसाईलफेक करुन त्यांना मारताना, ज्यांच्या अंतःकरणाला कुठला विचार शिवला नाही, ज्यांचं अंतःकरण किंचितही द्रवलं नाही… ते इस्त्रायली नेत्यान्याहू-सरकार, गाझा-इस्पितळावरील हल्ल्यानंतर “तो मी नव्हेच”, या बदमाषीपूर्ण भांडवली-शैलीत… “तो हल्ला करणारे, आम्ही नव्हेच” असं, गेंड्याची कातडी पांघरुन निगरगट्टपणे जगभरच्या प्रचार-प्रसार माध्यमांतून बोंबलत सांगू

गाझा-इस्पितळावरील इस्त्रायली-नृशंस हल्ला Read More »

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’

कालपरवापर्यंत, देशामधील अनेक कंपन्या-कारखान्यांमध्ये, विशेषतः, महाराष्ट्रातील रासायनिक उद्योगांमध्ये, औद्योगिक-अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर ताण म्हणजे, ‘आऊटसोर्सिग’च्या शोषणकारी नव-भांडवली तंत्रातून बनलेल्या छोट्यामोठ्या वर्कशाॅप्समधील तर, सातत्याने होणाऱ्या शेकडो-हजारो अपघातांची ना कुठली नोंद, ना मरणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या ‘कामगार’ नावाच्या आधुनिक ‘गुलामां’ची कुणाला पर्वा! …औद्योगिक-सुरक्षिततेचे अतिशय खर्चिक व काटेकोर नियम पाळण्यात अमानुष हेळसांड संबंधितांकडून होत असल्यानेच, ती मानवनिर्मित

‘अग्निवीर-प्रथा’ ही ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तल्या गुलामगिरीचीच ‘पिलावळ’ Read More »

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!!

सतत, आपला राजकीय स्वार्थ व सोयीनुसार बदलत्या राजकीय-भूमिका आणि गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून झपाट्याने ‘बेदखल’ होऊ लागलेल्या अजितदादा पवारांनी, ‘आखरी रास्ता और डुबने से पहले एक तिनके का वास्ता” म्हणून, आपल्या मंत्रिमंडळातील दोन मुस्लिम मंत्र्यांसोबत (हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार) घेतलेल्या बैठकीत “५% मुस्लिम आरक्षणा”चा एल्गार करुन सध्याच्या गद्दारीच्या, फोडाफोडीच्या महाराष्ट्रीय राजकारणात मोठा बाॅम्बस्फोटच केलाय! अजितदादा,

सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर… “५% मुस्लिम आरक्षण” एल्गाराचा, अजित पवारांचा ‘फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम’…!!! Read More »

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?

सध्या आहे त्या अवस्थेतल्या लुटारु-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’तली ‘बँकिंग-व्यवस्था, जनसामान्यांना खरंच आकळायला लागली (जे फार काही अवघड मुळीच नव्हे) तर, रिझर्व्ह बॅंकेसह सर्वच बँकांची पद्धतशीर लूट कशी सुरु आहे, ते जनतेला हळूहळू ध्यानात येईल. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन किंवा ऊर्जित पटेल, ती लूट करु देत नव्हते… म्हणून, पं. नरेंद्र मोदींनी त्यांना नाहक बदनाम करताना, “रिझर्व्ह

२६ सप्टेंबर-२०२३ च्या ‘सकाळ’च्या अंकात छापलेलं, हेन्री फोर्ड यांचं भाष्य, एवढं ‘स्वयंस्पष्ट’ आहे की, “हातच्या कंकणाला आरसा कशाला”? Read More »

कॉर्पोरेट-दहशतवाद

गेली अनेक वर्षांपासून कंपनी-दहशतवादाबद्दल (Corporate-Terrorism) कंठशोष करुन आम्ही बोलतो आहोत, जीव तोडून लिहीतो आहोत… पण, लक्षात कोण घेतो ??? ‘दहशतवाद’, हा कोणाचाही, कुठल्याही कारणाने असो… त्याची नांगी वेळीच साफ ठेचून टाकलीच पाहीजे! विशेषतः, “जातधर्मीय आणि काॅर्पोरेटीय दहशतवाद” तर, जिथे असेल तिथे, जिथे दिसेल तिथे… कठोरपणे समूळ निपटून काढलाच पाहीजे. …मात्र, जिथे ‘सततच्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध दाद मागणं

कॉर्पोरेट-दहशतवाद Read More »

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली

आपल्या धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कामगार-कर्मचारीवर्गाने आणि ‘सेऊ’च्या सभासदांनी, या भयंकर उष्म्यात (‘जागतिक तापमानवाढी’मुळे तापमान जवळपास ४३-४४° सेंटीग्रेड पर्यंत पोहोचलेलं असताना) एवढी मोठी रॅली काढण्यासाठी, जी मेहनत घेतली व त्यात धाडसाने प्रत्यक्ष सहभाग घेतला… त्याला, तोड नाही! अन्य कुठलाही प्रस्थापित राजकीय नेता वा पक्ष, वाटेल तेवढा पैसा फेकूनही अशी रॅली, या

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली Read More »

एसटी संपाचं कवित्व….

(उषःकाल होता होता काळरात झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!) महाराष्ट्रभरात विखुरलेला ८५ हजारांच्या वर कामगार-कर्मचारीवर्ग, एवढ्या पाच-साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपात स्वतःला झोकून देतो…. त्याचा अर्थ एकच, त्यांच्या पायाखाली दीर्घकाळ बरंच काही जळत होतं, पोटात आणि मस्तकात दीर्घकाळ एक आगीचा लोळ उठत होता. ग्रामीण मराठी जनतेनंही कमालीचा त्रास व अडचण सोसून, या आपल्या लढवय्या ‘मराठी

एसटी संपाचं कवित्व…. Read More »

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन

जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण, तेच खरं पिढ्यापिढ्यांचं खास ‘रामा’साठीचं  वात्सल्य, प्रेम आणि संवेदनशील असं, उत्तर भारतीय संबोधन होतं आणि तेच मराठीत ‘जय सीताराम’ होतं! ‘जय सियाराम, जय सीताराम’ला मागे सारुन ‘जय श्रीराम’सारखं काहीसं उग्र स्वरुपाचं राम-संबोधन, कधितरी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या काळाच्या आसपास उत्तर भारतात प्रसवलं, पसरवलं गेलं असावं… ते ही अगदी

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन Read More »