Rajan Raje

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली

आपल्या धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कामगार-कर्मचारीवर्गाने आणि ‘सेऊ’च्या सभासदांनी, या भयंकर उष्म्यात (‘जागतिक तापमानवाढी’मुळे तापमान जवळपास ४३-४४° सेंटीग्रेड पर्यंत पोहोचलेलं असताना) एवढी मोठी रॅली काढण्यासाठी, जी मेहनत घेतली व त्यात धाडसाने प्रत्यक्ष सहभाग घेतला… त्याला, तोड नाही! अन्य कुठलाही प्रस्थापित राजकीय नेता वा पक्ष, वाटेल तेवढा पैसा फेकूनही अशी रॅली, या […]

‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली Read More »

एसटी संपाचं कवित्व….

(उषःकाल होता होता काळरात झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!) महाराष्ट्रभरात विखुरलेला ८५ हजारांच्या वर कामगार-कर्मचारीवर्ग, एवढ्या पाच-साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपात स्वतःला झोकून देतो…. त्याचा अर्थ एकच, त्यांच्या पायाखाली दीर्घकाळ बरंच काही जळत होतं, पोटात आणि मस्तकात दीर्घकाळ एक आगीचा लोळ उठत होता. ग्रामीण मराठी जनतेनंही कमालीचा त्रास व अडचण सोसून, या आपल्या लढवय्या ‘मराठी

एसटी संपाचं कवित्व…. Read More »

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन

जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण, तेच खरं पिढ्यापिढ्यांचं खास ‘रामा’साठीचं  वात्सल्य, प्रेम आणि संवेदनशील असं, उत्तर भारतीय संबोधन होतं आणि तेच मराठीत ‘जय सीताराम’ होतं! ‘जय सियाराम, जय सीताराम’ला मागे सारुन ‘जय श्रीराम’सारखं काहीसं उग्र स्वरुपाचं राम-संबोधन, कधितरी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या काळाच्या आसपास उत्तर भारतात प्रसवलं, पसरवलं गेलं असावं… ते ही अगदी

वादे वादे जायते तत्त्वबोध: जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण तेच खरं पिढ्यापिढ्यांचं वात्सल्य प्रेम आणि संवेदनशील राम-संबोधन Read More »

चंगळवाद

चंगळवाद, महत्त्वाकांक्षाग्रस्तता आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचा संबंध असून त्यातून आत्यंतिक स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन संबंधित लोकं नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रस्त होत, व्यसनाधीन बनतात…. केवळ, इथपर्यंतच अच्युत गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे, मानवीअधोगतीचा प्रवास होत नाही; तो ‘चंगळवादा’तून सुरु झालेला हा प्रवास अखेर ‘मानवी-असतित्वा’लाच ग्रहण लावण्यापर्यंत थेट पोहोचतो कसा, हे

चंगळवाद Read More »

ज्योतिराव फुले: भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व

११ एप्रिल १८२७ रोजी, सावतामाळी या शूद्र जातीतल्या  ‘गोर्‍हे’ कुटुंबात गोविंदराव व चिमणाबाईंच्या पोटी समतेची आणि सत्यशोधनाची ‘ज्योत’ घेऊन ‘ज्योति’राव जन्माला यावा आणि त्याच दिवशी पुण्याच्या पेशवाईचा (जरी, पेशवाई १८१८ साली राजकीयदृष्ट्या शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकावून इंग्रजांनी संपुष्टात आणली होती) ‘मेरुदंड’ असलेला शनिवारवाडा आगीत जळून पूर्णतया भस्मसात व्हावा… हा नियतीचा एक अजब, विलक्षण ‘संकेत’ असला;

ज्योतिराव फुले: भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व Read More »

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही….

सोमवार (दि.४ एप्रिल-२०२२) रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भाषण करताना भारताचे ‘कायमस्वरुपी प्रतिनिधित्व’ करणारे सदस्य श्री. तिरुमूर्ती म्हणाले, “बुकामधील अस्वस्थ करणार्‍या हत्याकांडाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याची स्वतंत्रपणे निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी करतो.” * यातून नेमकी भारताची काय भूमिका दिसते? रशियाचं लष्कर, त्या बुका परिसरातून माघार घेण्याअगोदर काही दिवसांपूर्वीच अनन्वित छळ करुन,

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही…. Read More »

हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत….

एप्रिल महिना उजाडताच, Amazon.com Inc (AMZN.O) या फार मोठ्या अमेरिकन कंपनीच्या न्यूयाॅर्क शाखेत, प्रथमच कामगार-संघटना (युनियन) गुप्तमतदानाद्वारे अस्तित्वात आलीय. आजवर आपल्या कंपनीत युनियनबाजी होऊ नये, यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या कुटील नीतिचा आणि प्रचंड ‘कंपनी-दहशती’चा (Corporate-Terrorism) बेलगाम वापर करुनही, हे ज्यो बायडेन प्रशासनाच्या आशिर्वादाने अघटित घडलेलं आहे! जवळपास १० लाख लोकांना रोजगार पुरविणारी ॲमेझाॅन ही

हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत…. Read More »

‘‘भांडवलखोर-नफेखोर आणि म्हणूनच युद्धखोर’’,

‘‘युक्रेन जर ‘नाटो’चा (NATO) सदस्य झाला तर, ‘नाटो’च्या कराराप्रमाणे अमेरिका आपले सैनिक, मिसाईल आणि अगदी अणुबॉम्ब युक्रेनमधे ठेऊ शकणार आहे… शिवाय, नाटोच्या करारानुसार नाटोच्या कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर नाटोमधील सर्व देश एकत्र येऊन त्या देशाविरुद्ध युद्ध करु शकतात… रशियाविरुद्ध जगातील ३०पेक्षा जास्त देश असा सामना सुरु होऊ शकतो… जे रशिया कसं स्विकारणार आहे?’’…

‘‘भांडवलखोर-नफेखोर आणि म्हणूनच युद्धखोर’’, Read More »

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन…

एकीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यावर ‘करोडोंची खैरात’ करत असतानाच (या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी, उपरती झाल्यासारखी ही घरं मोफत दिली जाणार नसल्याचं म्हटलंय), ‘आम आदमी पार्टी’चे पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘One MLA, One Pension’ असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने कितीही वेळा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंदजी केजरिवाल यांचं ‘‘धर्मराज्य पक्षा’’तर्फे हार्दिक अभिनंदन… Read More »

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान देताना, ‘‘भाजपा, स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो; पण, त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते… भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, ‘आम आदमी पार्टी’ राजकारण सोडेल’’, असं अरविंद केजरीवाल यांनी दंड थोपटत म्हटलंय.. अरविंद

अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली महापालिका निवडणुकांवर आक्रमक वक्तव्य Read More »