स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरावर काय न्यायालयीन कारवाई करायची असेल ती करा…पण, कायदा हातात घेणाऱ्यांचे हात कायद्यानेच ‘कलम’ लावून ‘कलम’ करा….
कुणाल कामरा यांच्या कार्यालयाच्या तोडफोड-प्रकरणी “तोडलं त्याचं समर्थन करत नाही”, असं मंत्री उदय सामंतांचं म्हणणं असेल; तर, त्या संबंधितांना तत्काळ नुकसानभरपाई कधि दिली जाणार? नागपूर-दंगल प्रकरणी विद्युतवेगाने नुकसानभरपाईची कारवाई करु पहाणारे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याप्रकरणी, नुकसानभरपाई देण्याची कधि तत्परता दाखवणार की, नेहमीप्रमाणेच अशा ठिकाणी कच खाणार? निलेश राणे, भरत गोगावले जर टीव्हीवर येऊन उघडपणे हिंसाचाराचं समर्थन […]