Rajan Raje

बिल्कीस बानो आणि अयोध्येतलं राममंदिर…

“बिल्कीस बानो, प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या सणसणीत निकालाने…ब्रिजभूषणसिंग, कुलदीपसिंग सेंगर, संदीपसिंग सैनी यासारख्या अनेक बलात्कारी किंवा लैंगिक-अपराधी आमदार-खासदार-मंत्र्यांनी खच्चून भरलेल्या; तरीही, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशा दांभिक घोषणा तारस्वरात देणाऱ्या आणि ‘मुँह में राम, बगल में छुरी’ पॅटर्न राबवत अयोध्येत ‘राममंदिर’ बांधू पहाणाऱ्या…भाजपाई डबल-इंजिन सरकारांचं जागतिकस्तरावर, असं काही ‘वस्त्रहरण’ अमृतकाळात झालंय की, जे गेल्या सातआठ दशकात, […]

बिल्कीस बानो आणि अयोध्येतलं राममंदिर… Read More »

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल

छत्तीसगडच्या आपल्या निवडणूक-जाहीरनाम्यात, ज्या भाजपाने ‘हसदेव’च्या जंगलातल्या कोळसा-खाणकामाला, तेथील जनतेशी केलेली गद्दारी व धोका म्हटलं होतं व सत्तेवर येताच, ते खाणकाम थांबवण्याचा ‘वादा’ (खरं म्हणजे, ‘चुनावी-जुमला’) केला होता…त्याच, ‘हसदेव’च्या जंगलातल्या, ३०,००० प्राचीन वृक्षांवर, भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तत्काळ गदा आली! स्थानिक गावांमधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना व गेली १० वर्षे त्याविरोधात चळवळ करणाऱ्यांना…सलग तीन

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल Read More »

“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच…

‘स्वप्नात हत्ती दिसणं’, हे सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात ऐश्वर्यसंपन्नता-सत्तावैभव, याचं निदर्शक मानलं जातं. मात्र, वरील ‘मायावी’ उद्गारांमुळे, ‘बसपा’चा ‘हत्ती’ मोदी-शहांच्या स्वप्नात येऊ लागलाय…मात्र, तो आलाय, २०२४ च्या लोकसभा-निवडणुकीसंदर्भात सत्तावैभवाच्या शकुनाऐवजी, एक अपशकून बनूनच! …तिथून पुढे घडलेला, ताजा घटनाक्रम पाहिला की, एखाद्या सुजाण-सज्जन भारतीय नागरिकाच्या मनात-अंतःकरणात एकतर संतापाची तिडीक जावी किंवा त्याच्यावर, स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेण्याची

“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच… Read More »

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!!

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! सर्वप्रथम, २० हजार कोटींचा ‘सेंट्रल-व्हिस्टा’ प्रकल्प (तथाकथित अमृतकाळात, सगळी ब्रिटीश व मोगल-राजवटीतली नावं बदलली जात असताना, ‘सेंट्रल-व्हिस्टा’ हे इंग्रजी नाव ठेवलं जातं किंवा गुजराथच्या ‘अहमदाबाद’चं नाव बदललं जात नाही, हे विशेषच) बांधणाऱ्या भाजपाई ‘वास्तुविशारदा’ला तुरुंगात टाका, ज्याने जेमतेम ६

नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते…त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली…!!! Read More »

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल

सर्वोच्च-निकालानंतर आता काश्मीरचा, इथून पुढे फक्त पहात रहा, नवा प्रवास….”नैसर्गिक-सौंदर्याने विनटलेलं व काश्मिरियतचा सांस्कृतिक-वारसा लाभलेलं पृथ्वीवरचं नंदनवन” ते “बड्या भांडवलदारांची, बड्या भांडवलदारांकडून, बड्या भांडवलदारांसाठी उभारली गेलेली कृत्रिम-अनैसर्गिक सुवर्णलंका”! ही ‘सुवर्णलंका’ असेल; स्थानिक जनसामान्यांवरील अन्याय-शोषण-अत्याचारांनी भरलेली…रावणासारख्या अविवेकी, नीतिशून्य, सैतानी ‘विकासा’ची कास धरत, “मुँह में राम और बगल में रावण”, या कावेबाज राजनितीचा हात धरुन उभारलेली! ———————————————————-

काश्मीरच्या ३७० कलमाचा निकाल Read More »

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?

(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्‍या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता? Read More »

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!!

**जर कुठले बडे राजकारणी किंवा बडे सरकारी अधिकारी अथवा त्यांचे कुटुंबिय…जर, या ‘मानवनिर्मित’ आपदेत सापडले असते; तर, सुटकेसाठी एवढा प्रदीर्घ काळ लागला असता का? **समस्त पर्यावरणतज्ज्ञ ठिसूळ हिमालयीन प्रदेशाशी बोगदा खणणे, खाणकाम करणे वगैरे धोकादायक खेळू नका, असे तडफडून सांगत असताना व यापूर्वी, अशा दुःसाहसातून अनेक जीवघेण्या मोठमोठ्या दुर्घटना घडल्या असतानाही…निसर्गाशी द्यूत खेळण्याचा, हा अवसानघातकी

४१ कामगारांची उत्तराखंडच्या ढासळलेल्या बोगद्यातून एकदाची सुटका झाली…या सुटकेच्या ‘तमाशा’चं कवित्व शिल्लक उरलंय, त्यातून निर्माण झालेले काही अनुत्तरित प्रश्न…!!! Read More »

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे…

विविध कामगार-संघटना आणि ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन गेली दोनतीन दशके आम्ही सातत्याने, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चातच्या आधुनिक रक्तपिपासू-शोषक भांडवली-व्यवस्थेच्या (Vampire-State System) ‘बकासुराचा प्राण’… ‘कंत्राटी-कामगार पद्धत, आऊटसोर्सिग’ सारख्या अमानुष-घृणास्पद शोषण करणाऱ्या, भांडवली-गुहेमध्ये दडलेल्या ‘पिंजऱ्यातील पोपटा’त आहे… अशी मांडणी करीत आलेलो आहोत! ‘नफ़रत छोड़ो, भारत जोड़ो’चे प्रणेते व ‘भाजपा-संघ’कृत “विद्वेषी बाजारात प्रेमाचं दुकान” उघडणारे व अन्याय-अत्याचार-शोषणाग्रस्त

‘गौतम अदानी’ नावाच्या ‘पोपटा’तच, भारताच्या ‘शहेनशहा’चा आत्मा किंवा प्राण दडलेला आहे… Read More »

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

… ‘मी परत येईन, मी परत येणार’ फेम उपमुख्यमंत्र्यांच्या वरील उद्गारासंदर्भात, त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेकडून काही विचारणा…. १) ‘शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत’, याचा गर्भित अर्थ, “आमच्या मातृसंस्थेची शिकवणच मुसोलिनीच्या धर्तीची ‘काळी टोपी’वाली (कशी, ते वाचकांनीच जाणावं)…तेव्हा, विचारतो कोण, तुमच्या असल्या षंढ-अहिंसक आंदोलनांना?” असा घ्यायचा का? २) “हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत”, याचा

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) Read More »

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”???

केवळ साडेतीन लाख मूळ नागरिक व २३ लाखाच्या आसपास देशाबाहेरचे स्थलांतरित मजूर (त्यातले १० लाख भारतीय, अर्थातच प्रामुख्याने केरळी)…अशा, अंगाने अगदीच किरकोळ असलेल्या, एका कतार नावाच्या देशाने, भारतासारख्या खंडप्राय देशाला एकदा नव्हे; दोनदा फटकारत, आपल्या देशाची आणि देशाच्या तथाकथित ‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? …पहिल्यांदा भाजपाच्या नुपूर शर्मा-नवीन जिंदालकृत प्रेषित

‘विश्वगुरुं’च्या अब्रूची लक्तरं, “कतारी देशाच्या कुंपणाच्या तारी, वाळवंटात वाळत घालावीत”??? Read More »