मराठी

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो?

अमेरिकेत १९६५ साली तळाचा कामगार आणि सर्वोच्च स्थानी असलेला CEO यांच्या वेतनमानाचं (सोयीसुविधा, सवलतींसह) १ : २० असणारं गुणोत्तर गेल्यावर्षी (वर्ष-२०१८) जर, १ : २८७ पर्यंत पोहोचल्याचा समस्त अमेरिकन नागरिकांना एवढा जबरदस्त धक्का बसला असेल; तर, भारतात तर हे गुणोत्तर, केव्हाच १ : १००० चा आकडा पार करुन गेलय… एवढी महाभीषण आर्थिक-विषमता मौजूद असूनही, भारतीय […]

‘‘स्थापनेपासून धर्मराज्य पक्षा’’च्या आणि तत्पूर्वी, कामगार-चळवळीच्या व अन्य सामाजिक चळवळींच्या व्यासपीठावरुन आम्ही गेल्या दोन दशकाहून अधिककाळ, हे तळमळून व कळवळून सांगतोय… पण, लक्षात कोण घेतो? Read More »

सद्यस्थितीत, ‘‘None Of The Above’’ (NOTA)… हाच, एकमेव पर्याय !!!

धर्मराज्य पक्षा तर्फे None Of The Above (NOTA) चं बटण दाबण्याचा निर्णय व आदेश… का व कशामुळे ??? मित्रहो, UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… हे सर्वच, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’चा (Vampire-State System) एकतर अविभाज्य भाग आहेत वा ते स्वतःच ही व्यवस्था, निर्माण करुन देशभर मूठभरांच्या स्वार्थासाठी अन्यायकारकरित्या चालवतायत! सद्यस्थितीत, खालील राजकीय-धोरणे व विचारधारा

सद्यस्थितीत, ‘‘None Of The Above’’ (NOTA)… हाच, एकमेव पर्याय !!! Read More »

अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत…..

इथून पुढे, त्याचा पृथ्वीवरील रंगमंचावरचा, दुसरा खलनायकी-अंक सुरु होतो… तो म्हणजे, “आधुनिक माणूस, हा पृथ्वीच्याच गर्भात वाढलेला आणि पृथ्वीच्या पोटात शिरलेला भयंकर ‘विषाणू’ या रुपाने!” …असा एक विषाणू की, जो AIDS, अँथ्रॅक्स्, इबोला यापेक्षाही सहस्त्रपटीने खतरनाक व प्राणघातक ‘संसर्गजन्य विषाणू’ असून, त्याने संपूर्ण वसुंधरा ‘ज्वराग्रस्त’ झालीय… तिचा, ज्वर अथवा ताप, आता टिपेला पोहोचायला लागला असून

अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत….. Read More »

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय!

असे, लाखो-करोडो शिलेदार उभं रहाणं, ही काळाची आजची तातडीची गरज आहेच आणि तसं होताना हळूहळू जगभर दिसायला लागलयं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही……… मुळात, असल्या सगळ्या “कार्बन-केंद्री” विनाशकारी विकासाला, GDP आधारित अर्थव्यवस्थेला, बेबंद शहरीकरण व औद्योगिकीकरणाला आता ‘पूर्णविराम’ दिला नाही… जनसंख्या-जीवनशैली कठोरपणे रोखली नाही, वहातूक व्यवस्था, घरबांधणी (सिमेंट-लोखंडाचा वापर टाळणे), शेतीव्यवस्था (रासायनिक व

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय! Read More »

संघटनात्मक-ताकद

एक दगड उचला आणि कुत्र्याला मारा…. बघा, तो लगेच कुई कुई ओरडत पळून जाईल  पण, तोच दगड पुन्हा उचला बघू, आणि, आता फेका, मधमाश्यांच्या पोळ्यावर…. क्षणार्धात, त्या सर्व मधमाशा मिळून एकजुटीने तुमच्यावर असा काही हल्लाबोल करतील की, तोबा तोबा…. तुम्ही जीव घेऊन, दगडाने भेदरलेल्या कुत्र्यापेक्षा, जास्त वेगाने ढुंगणाला पाय लावून पळून जाल! दगड तोच… आणि मारणाराही तोच…

संघटनात्मक-ताकद Read More »

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि,

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!! Read More »

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं अजिबात… पण, खिशाला अजिबात परवडत नसलं; तरीही, हल्ली सगळ्याचाच उत्सव साजरा करणाऱ्या, उत्सवी मराठी मंडळींना त्याचं फार अप्रूप…. म्हणून, लोकाग्रहास्तव का होईना; त्यानिमित्ताने, निदान व्यक्तिगत संपर्काचा संसर्ग व्हावा, हा या संदेशामागचा उद्देश! “एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं Read More »

‘‘शाॅकिंग अँड कम्प्लिट्ली स्टॅगरिंग….अॅन् आर्क्टिक हिट वेव्ह, हॅज् अरायव्हड्!’’ ….डेव्हीड फिलीप्स (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंज… कॅनडा)

मानवीवस्तीचे उत्तरेकडचं शेवटचं ठिकाण म्हणजे, कॅनडातील उत्तर ध्रुवापासून अवघ्या ६०० मैलावर असलेलं, ‘‘कॅनडाज् अॅलर्ट’’ या ठिकाणी १४ जुलै-२०१९च्या रविवारी  २१° सेंटिग्रेड एवढे उच्च तापमान धक्कादायकरित्या नोंदले गेले. ही जणू, ध्रुवप्रदेशातली प्रलयंकारी उष्णतेची लाटच होय! पृथ्वीच्या इतर कुठल्याही भागापेक्षा दोन्ही ध्रुवांवरील तापमान तिप्पट वेगाने वाढत चालल्याचं, आर्मेल कॅस्टॅलान या कॅनडा सरकारमधल्या अजून एका हवामानतज्ज्ञाचं म्हणणं आहे.

‘‘शाॅकिंग अँड कम्प्लिट्ली स्टॅगरिंग….अॅन् आर्क्टिक हिट वेव्ह, हॅज् अरायव्हड्!’’ ….डेव्हीड फिलीप्स (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट चेंज… कॅनडा) Read More »

‘‘विद्यार्थ्यांच्या पायाखाली वितळणारे ‘हिमखंड’ आणि गळ्यात फासाचे ‘दोरखंड’…!!!’’

जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटामुळे मानवजात, कशी विनाशाच्या दिशेनं वेगाने वाटचाल करतेय, याचं पर्यावरणीय आयामातून कलात्मकरित्या कोलाॅन (मध्य जर्मनी) येथील ‘इकोसाईन’च्या अॅने सिकोरा, सोफिया कॅथरिन वगैरे तरुण विद्यार्थ्यांनी एका ‘‘शालेय शिक्षणातील प्रकल्पा’’अंतर्गत अत्यंत प्रभावी दिग्दर्शन नुकतचं केलं. या शालेय शिक्षण-प्रकल्पात (school project) सदर विद्यार्थ्यांनी गळ्याभोवती सैलसररित्या फासाचे दोर अडकवून घेतले होते व हे सर्व विद्यार्थी वितळणाऱ्या बर्फाच्या लाद्यांवर

‘‘विद्यार्थ्यांच्या पायाखाली वितळणारे ‘हिमखंड’ आणि गळ्यात फासाचे ‘दोरखंड’…!!!’’ Read More »

मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था

सर्व शाळांमधून (खरंतरं, हल्लीच्या भाषेत ‘स्कूल’मधून) मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था (मराठीचा उठताबसता उद्घोष करणाऱ्या राजकारण्यांकरवीच), तेवढी वाईट झालेली नसतानाची, ही कथा…. मात्र, तोपर्यंत, ‘‘द्रोणाचार्य-सानेगुरुजी-पुलं’चे चितळे मास्तर आणि आताचे भुजबळ सर’’… असा आचार्य, ते गुरुजी, ते मास्तर, ते थेट ‘सर’… हा लांबवरचा प्रवास घडून, ‘‘चुलीतलं ‘सरपण’ होण्यागत’’, शिक्षकांची वाईट अवस्था मात्र

मराठी विषय ‘अनिवार्य’ करण्याची वेळ येण्याइतपत, महाराष्ट्रात मराठीची अवस्था Read More »