राजन राजे

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६० […]

‘नॉएडा’ चा धडा! Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने…..

तुम्ही ‘पांढरपेशे’ आहात की ‘श्रमजिवी’ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी’ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्रा’ला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ ते २ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. चंगळवाद-चैनीत अडकलेला, म्हणून स्वार्थी व संवेदनाशून्य झालेला, असा विखुरलेला मध्यमवर्ग पाहून, आता आपल्या दमन व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर अन्याय्य ‘मजूर-कंत्राटदारी’ प्रथेचा तीव्र निषेध नोंदविणाऱ्या ‘सुदर्शनधारी दहीहंडी’च्या निमित्ताने….. Read More »

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’!

——————————————————————————- (कृपया वेळात वेळ काढून वाचा आणि गांभिर्याने विचार करून कृतिशील व्हा!) ——————————————————————————– निर्दय जागतिकीकरण – विवेकशून्य आधुनिकीकरण – बेलगाम संगणकीकरण, यांच्या चौफेर उधळलेल्या ‘वारू’च्या टापांखाली चिरडल्या गेलेल्या कामगारांची सर्वत्र अवस्था अतिशय दयनीय व शोचनीय झालेली आहे. मूठभरांनी मणामणांनी घरं भरायची आणि कणाकणांसाठी आगरी-कोळी-कुणबी-मराठा-आंबेडकरी इ. बहुजनांनी तिष्ठत… तळमळत उंबरठयावर उभं रहायचं! लूट… फक्त संधिसाधू लूट,

उत्पादन व सेवा-क्षेत्रातील ‘कंत्राटदारी’, ही नवी पिळवणूकीची ‘दमन-यंत्रणा’! Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »