Rajan Raje

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया

(पंजाबच्या आम आदमी पार्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करण्याचं धोरण अंगिकारलेलं दिसतंय व त्यानुसार, ३५,००० कामगार-कर्मचारीवर्गाला नोकरीत ‘कायम’ करुन घेतल्याचा खालीलप्रमाणे स्पृहणीय संदेश, माझे निकटचे स्नेही ॲड. विजय कुर्ले यांनी पाठवला; त्यावरील माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे….) हे अभिनंदनीय कार्य जरुर आहेच… हो, मी ते बिलकूल नाकारत नाहीच, नाकारु शकत नाही…. पण, आम्ही खाजगी क्षेत्रातील कंत्राटी-कामगार […]

‘आप’ची कंत्राटी कामगार विरोधी ‘सर्जिकल स्ट्राईक’ या मथळ्याच्या ॲड. विजय कुर्ले यांच्या संदेशावरील राजन राजे यांची प्रतिक्रिया Read More »

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय???

सर्वप्रथम, पंजाबच्या भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारचं मनःपूत अभिनंदन आणि सर्व आजीमाजी आमदार-मंत्र्यांचं बव्हंशी अनावश्यक व अतिशय खर्चिक असलेलं पोलिस-संरक्षण काढून घेण्याचा समयोचित पहिलावहिला प्रशासकीय निर्णय घेतल्याबद्दलही खूप खूप कौतुक! त्याचसोबत, भगतसिंगांच्या ‘खाटकर कलान’ या जन्मगावी  ‘आप’च्या नव्या सरकारने आपला शपथविधी-सोहळा आयोजित करावा, हे खरोखरीच स्पृहणीय होय… मात्र, तो त्या भगतसिंगांच्या जन्मगावी

हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय??? Read More »

काही तथाकथित उजवे विचारवंत आणि त्यांच्या दुटप्पी विचारधारेचा पर्दाफाश

काही तथाकथित ‘उजवे विचारवंत’ (डावे, नेहमीप्रमाणेच गोंधळलेले), इतरेजनांना ‘शहाणे’ ठरवत, स्वतःला शहाणपणातला जर ‘बाप’ समजत असतील; तर, त्यांची प्रथम पाळंमुळं तपासून चपखल उत्तर देणं, अगत्याचं ठरतं… कारण, ‘‘चातुर्वर्ण्य आधारित छुपी ‘वर्चस्ववादी’ उजवी विचारसरणी असलेले काही ‘जीवात्मे’, आम्ही युक्रेन-रशिया युद्धविषयक विविध संदेशांतून, जाज्वल्य भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचाच संदर्भ देत, त्यांचं ‘धोरण-पंगुत्व’ (माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या तथाकथित ‘धोरण-पंगुत्वा’वर टीकेचे

काही तथाकथित उजवे विचारवंत आणि त्यांच्या दुटप्पी विचारधारेचा पर्दाफाश Read More »

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत!

रशियाचा अध्यक्ष कोण… ब्लादिमीर पुतिन की, पहिल्या महायुद्धात रशियाला आपल्या वासवी, सैतानी लालसेने खड्ड्यात घालणारा ‘रासपुतिन’ ??? हे युद्ध, ‘रशिया विरुद्ध युक्रेन’, असं मुळीच नसून ‘‘एकटे ब्लादिमीर पुतिन विरुद्ध अवघा युक्रेन’’… असं असल्यामुळेच, प्रचंड दडपशाही व जीवाला मोठा धोका असतानाही प्राणाची पर्वा न करता बरेच जबाबदार रशियन नागरिक, पुतिनच्या रशियात निदर्शनं करण्याचं जीवघेणं धाडस करतायत,

आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत! Read More »

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय???

केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!  ‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय??? Read More »

Skeletons come tumbling out….

SEBI च्या संस्थापकांपैकी एक व NSE च्या भूतपूर्व MD व CEO चित्रा रामकृष्ण आणि तिचा हिमालयीन ‘बाबा’ यांच्या देशघातकी ‘संबंधां’वर पुढे जाऊन बराच प्रकाश पडेल, पडावा… पण, सध्या त्यातल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं, समाजहितासाठी खूपच गरजेचं आहे! आधुनिक ‘काॅर्पोरेटीय कारभारा’तील ‘अदृश्य’ स्वरुपाचा (जसा, भांडवलशाहीचा उद्गाता ॲडम स्मिथने वर्णिलेला ‘भांडवली-व्यवस्थे’त बाजारपेठीय ‘अदृश्य

Skeletons come tumbling out…. Read More »

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव

‘राष्ट्रपतींनाही जिचा मान ठेवावा लागतो; ती ‘खाकी वर्दी‘ गेली आणि स्मशानातल्या राखेसारखी दिसणारी ‘राखाडी वर्दी‘ मातली…. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय! महाराष्ट्रात ‘प्रजासत्ताका’चा अभिनिवेश निर्माण करणारा “माहिती अधिकार कायदा” २००३ साली संमत झाल्यावर, दुर्दैवाने पुढे दोनच वर्षांत तळागाळातल्या श्रमिकवर्गाच्या लोकशाही हक्काचं थडगं बांधणारा PASARA (Private Security Agencies Regulation Act-2005) कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळाने संमत केला.

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’….

“१५ ऑगस्ट-१९४७ रोजी ब्रिटीश जोखडातून स्वतंत्र झालेला भारत, २६ जानेवारी १९५० पासून एक ‘लोकशाहीवादी देश’ बनेल खरा… पण, पुढे जाऊन, भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की, पुन्हा आपलं ‘स्वातंत्र्य’ गमावून बसेल, हा माझ्या मनात उद्भवणारा प्रश्न आहे”, असं राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते. बाबासाहेबांच्या मनात ठाण मांडून बसलेली, पुन्हा ‘स्वातंत्र्य

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’…. Read More »

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….)

श्री. गॅब्रियल बोरिक, नवनिर्वाचित चिलीचे अध्यक्ष, चिलीचे नवे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करीत आहोत व प्रत्यक्ष निवडीपूर्वी काही दिवस आधीच, मी स्वतः तसं, आमच्या फेसबुक-पेजवर आणि व्हाॅट्स्ॲप ग्रुप्सवर (आपल्या निवडीचं) भाकित केलं होतं! अध्यक्ष महोदय, “भ्रष्टाचार तसेच, माणूस व निसर्गाचं शोषण, याबाबत कुठलीही तडजोड सहन न करण्या”च्या तत्त्वावर

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….) Read More »