विशेष लेख

या मध्यमवर्गीय, “ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे” मानसिकतेचं काय करायचं???

देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर….. २६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला भेटायला बापासोबत स्टेशनवर, त्यावेळी असणाऱ्या देविकाच्या कानात ट्रेन्सच्या चिरपरिचित धडाडण्याच्या आवाजासोबत, अचानक डांग्या फटाक्यांची माळ भर स्टेशनात कुणी लावल्याचा ध्वनी घुमला… क्षणभर दचकून तिनं वडिलांचा हात घट्ट धरला, तोच तिच्या पित्यानं तिला “देविका पळ” […]

या मध्यमवर्गीय, “ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे” मानसिकतेचं काय करायचं??? Read More »

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत,

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ??? Read More »

तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता?

… केवळ, आपल्या निसर्गदत्त भुकेला भागवणं, आपल्या पोटाचा खड्डा भरणं…. हा एवढा मोठा ‘गुन्हा‘ होतो की, त्यामुळे ती स्वतःच ‘वध्य‘ ठरावी??? अरेरे, अखेरीस, यवतमाळच्या १३ माणसांचे बळी घेणाऱ्या त्या, कथित ‘नरभक्षक‘ वाघिणीची ‘शिकार‘ यथासांग पार पडलीच….. त्या निमित्ताने, आपली आजवरची निसर्ग-पर्यावरणाप्रति केलेली महापातकं झाकण्यासाठी, सुसंघटित स्वरुपाच्या ‘मानवी-क्रौर्या‘नं, एक नवा अध्याय रचलाय!!! काय आणि कुठला दोष,

तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता? Read More »

आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!!

गेल्या ४ ऑक्टोबर-२०१८ पासून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि सॅन जोस शहरातील एकूण ७ पंचतारांकित मॅरिऑट हाॅटेलमधील जवळपास २५०० कामगार (साधारण ९०% कर्मचारी) संपावर गेलेत. दीर्घकालीन वाटाघाटींद्वारे पगारवाढ, नोकरीची हमी तसेच, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता… या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झडूनही कुठलाही उभयपक्षी मान्य, असा सन्मानजनक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर गेलेत. या ९०%हून अधिक कर्मचारी-कामगारांनी संघटना-नेतृत्त्वासोबत निष्ठेनं

आंदोलनं जगभरात कुठेही होवोत…. प्रत्येक आंदोलनातून कुठला न् कुठला ‘संदेश’ मिळत असतो… तर, कधि कुठला ‘धडा’ शिकायला मिळत असतो!!! Read More »

…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!!

“कुपोषणानं मरणासन्न होऊन, ऊन्हातान्हात निपचित पडलेली एक लहानगी ‘मुलगी‘, कधि मरतेय आणि कधि आपण तिचा फडशा पाडतोय, यासाठी टपून बसलेले एक गिधाड”, ….सुदान देशामधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, असं प्रत्ययकारी दृश्य कॅमेऱ्यात अतिशय कौशल्याने बंदिस्त करणाऱ्या ‘केव्हिन कार्टर’ला, त्या फोटोबद्दल पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सन्मानाचं ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळालं खरं… पण, या सन्मानाचा आनंद काही त्याला, फार काळ उपभोगता

…..तोपर्यंत, “एक गिधाडं आणि एक लहान मुलगी”, असंच काहीसं त्या फोटोविषयी सारे म्हणतं राहीले होते !!! Read More »

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती…

‘संत निगमानंदजीं‘ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद‘ यांनी ‘गंगामैय्ये‘च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास‘, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज‘, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire

‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी ‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ या पुण्यात्म्यांच्या प्राणांची आहुती… Read More »

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती…..

“नमामि गंगे” आणि “माँ गंगामैय्याने मुझे यहाँ बुलाया है….” असं म्हणतं, उ. प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी, केवढे महान “गंगाभक्त” नव्हे काय? अहो, महाभारतातल्या गंगापुत्र पितामह भीष्म वा कुंतीपुत्र  दानशूर कर्णाची ‘गंगाभक्ती’ही थिटी पडावी… एवढी नरेंद्र मोदींची ‘गंगाभक्ती’ खरोखरीच अगम्य-अवर्णनीय नव्हे काय?? दिवाळीच्या मुहूर्तावर गंगेला लाखो तेलाचे दीप अर्पण करणारे मोदी पहा आणि गंगेच्याच

आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती….. Read More »

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!!

‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष म्हणून नव्हे; तर, या देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला अशा मोठ्या राजकीय व्यक्तिंच्या निधनापश्चात, काही साधेसुधे प्रश्न सतावत रहातात. प्रश्न असा…. ज्याची गेले काही दिवस, नंतर पुढे कित्येक महिने, वर्षे…. विविध दूरदर्शन वाहिन्यांवरुन साग्रसंगीत, रसभरीत (अगदी अंतःकरण गदगदून टाकणारी) चर्चा चालू राहील…. ती स्व. अटल बिहारी वाजपेयींची ‘संवेदनशीलता’, ही अशी विशिष्ट कोंदणातच

अटलजी… एका संवेदनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा!!! Read More »